धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
धडगाव महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात असलेले तालुक्याचे गाव आहे. या गावात एक हनुमान मंदिर असून तिथे परिक्रमावासींची राहण्याची सोय होते असे आम्ही ऐकून होतो. त्यामुळे आम्ही त्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरात जीर्णोद्धाराचे काम
चालू असल्यामुळे मुक्कामाची
सोय नव्हती. अशा
परिस्थितीत, एका तरुणाने आम्हाला एका
लहान बोळात असलेल्या एका
घराचा पत्ता दिला.
तिथे एक माताजी
बाहेर आल्या आणि
त्यांनी आम्हाला त्यांचे मूळ घर उघडून
दिले. त्या म्हणाल्या, 'हे
आमचे मूळ घर.
बाजूला आम्ही नवीन
घर बांधले आहे.
आता या घरात
कोणी परिक्रमावासी आले
तर त्यांची सोय
आम्ही करतो.' आम्हाला खूप
आनंद झाला.
आम्ही
आसने लावली आणि
सायंपूजा आटोपली. तेवढ्यात सुमारे
७५ वर्षांचे भगवे
कपडे, जटा असलेले
एक साधू आले.
ते म्हणाले, "परवापासून वाट
पाहतोय, कोणी परिक्रमावासी मुक्कामाला नव्हते.
परवा सुमारे ४५
लोक इथे राहून
गेले." हे होते महाराज शांतिगिरी. त्यांचा परिवार
खूप मोठा आहे
आणि धडगावात त्यांचा मोठा
व्यापार आहे, अनेक दुकाने
आहेत. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी संन्यास दीक्षा
घेतली असूनही त्यांची नर्मदा
मैयाची सेवा अव्याहत चालू
आहे.
महाराज
स्वभावाने खूप बोलके होते.
त्यांनी आम्हाला सांगितले, 'तुम्ही तुमची पूजा
आटोपून घ्या, नंतर
मंदिरात आरतीला या. नंतर
रात्री आपण निवांत
गप्पा मारू.' आम्ही
पूजा आटोपून मंदिरात आरतीसाठी गेलो.
महाराज आणि आम्ही
तिघे मिळून चौघांनी आरती
केली. आरती आटोपल्यावर आम्ही
खाली चटईवर बसलो.
मी मध्ये बसलो
होतो, डाव्या बाजूला
नवले महाराज आणि
उजव्या बाजूला सत्संगी महाराज
होते, तर शांतिगिरी महाराज
समोर बसले होते.
अचानक,
त्यांनी माझ्याकडे हात करून म्हटले,
"दत्तबावनी म्हणा."
मी
चक्रावलोच. 'महाराज, मी दत्तबावनी म्हणतो
हे आपणाला कसे
ठाऊक?' असा प्रश्न
मी त्यांना विचारला. यावर
ते नुसते हसले
आणि म्हणाले, 'म्हणा.'
ज्या माणसाला आपण
यापूर्वी कधीही भेटलो नाही
आणि भविष्यात कधी
भेटू काही सांगता
येत नाही, अशा
माणसाने नेमके आपण म्हणत
असलेले स्तोत्र म्हणावयास सांगणे
याला चमत्कार म्हणायचे नाही
तर काय?
दत्तबावनी म्हणून
झाल्यावर आम्ही आमच्या आसनांवर परत
आलो. अर्ध्या तासात
महाराज भोजनप्रसादीसाठी बोलावण्यासाठी आले.
त्यांनी आम्हाला त्यांच्या बंगल्यात नेले. माझ्या नियमाप्रमाणे मी
एकदाच पानात आलेले
भोजन घेतले. महाराज
पुन्हा पोळी वाढण्यासाठी आले,
तेव्हा मी त्यांना 'महाराज,
मी एकदाच घेतो'
असे सांगितले. हे
ऐकून त्यांना इतके
वाईट वाटले की
त्यांनी अक्षरशः हात जोडून पाच-सहा वेळा माझी
माफी मागितली. "माझी चूक
झाली, मला माफ
करा" असे ते म्हणाले. मी
त्यांना समजावले, 'महाराज, माझे पोट
भरले आहे. आपण
पहिल्यांदा वाढले होते तेच
पुरेसे होते. आपण
वाईट वाटून घेऊ
नका.'
त्यानंतर त्यांनी नवले
महाराज आणि सत्संगी महाराज
या दोघांनाही सांगितले, "हा माणूस
एकदाच पात्रात भोजन
घेतो, हे प्रत्येक वेळेस
वाढणाऱ्याला सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. याची
काळजी घ्या." त्यानंतरच्या प्रवासात आम्ही
जोपर्यंत बरोबर होतो, तोपर्यंत नवले
महाराज आणि सत्संगी महाराजांनी ही
जबाबदारी कसोशीने पार पाडली.
रात्री
उशिरापर्यंत महाराजांनी अध्यात्म, त्यांच्या आयुष्यात घडलेले चमत्कार, वेगवेगळे आखाडे
आणि त्यांच्यातील पदे
याची सविस्तर माहिती
आम्हाला दिली. महाराज एकंदरच
धडगाव परिसरात खूप
प्रसिद्ध असावेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे किमान दोन-चार जण सल्लामसलत किंवा कामासाठी येऊन गेले.
गुजरात राज्यात प्रवेश आणि शूलपाणीश्वराचे दर्शन
सकाळी
लवकर उठून आम्ही
स्नान, पूजा आटोपून
चहा घेतला आणि
महाराजांना 'नर्मदे हर' करून
पुढे निघालो. दुपारी
देव मोगरा माता संस्थान कुंडल येथे
थांबलो आणि रात्रीचा मुक्काम मोलगी येथील
भिलाशेठ यांच्या माय नर्मदा सेवाश्रमात झाला.
या आश्रमाचे बांधकाम चालू
आहे. इथे एका
यूट्यूबरने परिक्रमावासींच्या
मुलाखती घेतल्या, त्यात सत्संगी महाराजांनी भरभरून
मुलाखत दिली.
दुसऱ्या दिवशी
सकाळी आम्ही तिथून
निघून बिजलीगव्हाण मार्गे
वडफळी येथील
श्री चैतन्य आश्रमात पोहोचलो. हा
आश्रम एका नदीच्या किनाऱ्यावर आहे
आणि कुलदीप कुलकर्णी चालवतात. ते
नाना महाराज तराणेकर यांचे
भक्त आहेत. रोट्या
तयार करण्यासाठी मशीन
वापरणारा हा परिक्रमा मार्गावरील बहुधा
एकमेव आश्रम असावा.
अवघ्या अर्ध्या तासात
त्यांनी चाळीस-पन्नास परिक्रमावासींचे भोजन
तयार केले. भोजनप्रसादी घेतल्यानंतर आम्ही
बिछान्यावर आडवे झालो.
सकाळी लवकर उठून समोरचा पूल पार करून आम्ही गुजरात राज्यात प्रवेश केला. दुपारी चार-साडेचार पर्यंत झरवाणी येथील श्री संत गजानन महाराज अन्नक्षेत्रात पोहोचलो. आश्रम छोटासाच आहे पण सोय व्यवस्थित आहे. चालून आम्ही थकलो होतो, तरी दोन तासांत गोराकॉलनीपर्यंत पोहोचू शकलो असतो आणि सायंकाळची मैयाची आरती पाहता आली असती. पण सत्संगी महाराजांचा पाय दुखत होता आणि त्यांची कुरकुर सुरू झाली, त्यामुळे आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला.
सायंपूजा आटोपल्यानंतर माझ्याकडे असलेल्या गजानन
विजय ग्रंथाचा एक
अध्याय वाचण्याची परवानगी मी
आश्रमाच्या संचालकांना विचारली आणि त्यांनी ती
आनंदाने दिली. हा आश्रम
रस्त्याच्या कडेला जरी असला
तरी हा प्रदेश
डोंगराळ असल्यामुळे येथे बिबट्याचे भय
असते, त्यामुळे रात्री
अपरात्री आश्रमाच्या बाहेर कोणीही पडू
नये अशी सूचना
आम्हाला देण्यात आली होती.
नर्मदेच्या आरतीतील गूढ अनुभव
सकाळी
उठून आम्ही पुढे
चालण्यास सुरुवात केली. जय नारायण सुंदरकांड परिवार या
आश्रमात बालभोग घेतला आणि
तिथून पुढे जाऊन
शूलपाणीश्वराचे दर्शन
घेतले. इथे पुजारी
बाहेर गेले असल्यामुळे नर्मदा
खंडात प्रसिद्ध असलेले
एक महाराज तात्पुरती व्यवस्था बघत
होते. त्यांच्या बोलण्यात अहंकार
जाणवत होता. आम्ही
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रुद्रपाठ केला
आणि तिथून बाहेर
पडून मैयाच्या घाटाकडे गेलो.
तिथे
कल्याणमधील पासिंगची एक कार उभी
होती. 'ही बघा,
तुमच्या भागातली गाडी आहे,' असे
मी सत्संगी महाराजांना म्हणालो. तितक्यात त्या
गाडीतून एक महाराज बाहेर
पडले. आम्ही त्यांच्यासोबत असलेल्या माणसाला विचारले, 'ही
कल्याणची गाडी आहे का?'
तर ते 'हो'
म्हणाले. ते महाराज मौनव्रती होते.
त्यांनी प्रश्न लिहून आमची
चौकशी केली आणि
आशीर्वादही दिला.
आम्ही
हरिधाम आश्रमात जाऊन
आसन लावले. सायंकाळी मैया
किनारी आरती पाहण्यासाठी जायचे
होते. वाराणसीला जशी
गंगाआरती होते, त्याचप्रमाणे येथे
नर्मदा आरती होते.
वेळ मोकळा मिळाल्यामुळे कपडे
धुऊन वाळत टाकले.
तोपर्यंत भोजनप्रसादी तयार झाली. वेदपाठशाळेचे विद्यार्थी पुरुषसूक्ताचे पठण
करत परिक्रमावासींना भोजन
वाढत होते. त्यामुळे आजवरच्या सर्व
आश्रमांमध्ये हा आश्रम वेगळा
वाटत होता.
सायंकाळी आम्ही
लवकरच बाहेर पडून
आरतीसाठी गेलो. सुरुवातीला तिथे
कोणीही नव्हते, पण
जसजशी संध्याकाळ होत
गेली, तसतशी गर्दी
वाढत गेली आणि
मैयाचा घाट फुलून
गेला. आरती सुरू
झाल्यावर मला फार असे
काही विशेष वाटले
नाही, पण अचानक
माझे डोळे मिटले
गेले आणि एका
वेगळ्याच गुंगीत मी गेलो.
तासाभराने जेव्हा आरती आटोपली,
तेव्हा नवले महाराजांनी हाक
मारली. त्यावेळी माझे
डोळे उघडले. माझ्या
बंद डोळ्यांतून अश्रुधारा वाहत
होत्या.
नवले
महाराज म्हणाले, "तुमची चांगलीच समाधी
लागली होती......."
काय झाले
देव जाणे.
असे
घडले खरे. त्यानंतर आम्ही
घाईघाईने आश्रमात पोहोचलो. भोजनप्रसादी घेतली आणि झोपी
गेलो.
Marathi literature, spiritual journey, Narmada Parikrama, travelogue, personal narrative, divine connection, miraculous events, faith, humility, introspection
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineGuidance #Miracle #DuttBavani #Humility #Pilgrimage #NarmadaMaiya #GajananaMaharaj #Aarti
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा :
रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा :
शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा :
खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
·
तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
·
तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
·
तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
·
तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
·
तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
·
तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
Reviewed by ANN news network
on
९/१३/२०२५ ०७:०८:०० PM
Rating:

.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: