शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
आज,
सहा डिसेंबर २०२४,
सकाळी आम्ही आमची
आन्हिके आटोपली, मैयाची पूजा
केली आणि आमचे
गाठोडे घेऊन बाहेर
पडलो. थंडी चांगलीच होती,
थोडे धुकेही होते,
पण थोडे चालल्यावर अंगात
उब आली. आज
आम्ही शालिवाहनपर्यंत जाणार
होतो आणि बहुतांश रस्ता
मैयाच्या किनाऱ्याने होता. नदीकिनारील खाचखळगे नसलेली
वाट मिळाली, तर
तो 'अवघा आनंदच'
असतो, आणि आजची
वाट तशीच होती.
त्यामुळे आम्ही मजेत चाललो
होतो.
वाटेत
एक-दोन ठिकाणी
चहाचा प्रसाद मिळाला.
अकरा-साडेअकराच्या सुमारास आम्ही
बडगाव येथील
मांडव्य ऋषींच्या गुंफ़ेजवळ पोहोचलो. गुंफ़ेच्या आधी
असलेल्या एका हॉलमध्ये खूप
गर्दी होती, काही
वाहनेही होती. चौकशी केली
असता, 'विवेकजी' नावाचे
साधू त्यांच्या भक्तमंडळींसोबत परिक्रमा करत
असून, त्यांची यात्रा
लवकरच इथे पोहोचणार होती.
त्यांच्या भोजनाची आणि इतर व्यवस्थेची लगबग
चालू होती. एकूणच
ते दादागुरूंसारखेच मोठे
साधू असावेत.
महंतांचे
दर्शन आणि भोजनप्रसादी
तेवढ्यात आश्रमाचे महंत
मैयाकडून आले. मैयाला नैवेद्य दाखवायला गेले
असावेत. ते तरुण
होते. आम्हाला पाहताच
प्रसन्न हसत 'नर्मदे हर'
म्हणाले. पाच मिनिटांतच सेवेकऱ्याने 'भोजन
की सिताराम' अशी
हाक दिली. आम्ही
भोजनप्रसादी घेण्यासाठी गेलो. वाढताना महंत
म्हणाले, "आज आश्रमात हा
सेवेकरी आणि मी असे
दोघेच आहोत. बाकी
कोणी नाही. त्यामुळे आम्ही
जे भोजन तयार
केले आहे, त्यात
काही कमी-जास्ती
असेल, तर सांभाळून घ्या."
आता
याला काय म्हणावे? आमच्यासारख्या अनोळखी
लोकांना जेवण द्यावे आणि
वर कसलेही कारण
नसताना क्षमायाचनाही करावी?
खरे संत नेहमीच
विनयशील असतात. हे महंत
त्याचे मूर्तिमंत उदाहरण
होते. भोजनोत्तर थोडा
सत्संग झाला आणि
त्यांनी आम्हाला परिक्रमेबाबत काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. सायंकाळच्या सुमारास शालिवाहन येथे पोहोचलो. पलिकडच्या तिरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी महेश्वर आहे, तिथला घाट फ़ार सुंदर दिसत होता. तिथे जेव्हा पोहोचू तेव्हा तो नीट पाहता येईल. आता शालिवाहन येथे आहोत. ज्या ठिकाणाहून शालिवाहन शक सुरू झाले, ते हेच ठिकाण. येथे हजारो वर्षांपूर्वीचे शिवलिंग आहे. दिवंगत खासदार अनिल माधव दवे यांच्या प्रयत्नातून तेथे उभारण्यात आलेली एक धर्मशाळा आहे. त्याला लागूनच आश्रमही आहे. आम्ही त्या धर्मशाळेत आसने लावली. मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आश्रमात येऊन मैयाची सायंपूजा केली.
शालिवाहन
येथील रात्र
आणि नवा दिवस
सात-साडेसातच्या सुमारास 'भोजन की सिताराम' झाली.
भोजन करून आम्ही
आमच्या आसनावर येऊन
बसलो. आश्रमात चांगलीच गर्दी
होती. मी माझ्याकडे असलेले
काही अतिरिक्त सामान
या आश्रमात कमी
केले.
रात्री
आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या महाराजांना मंदिर सकाळी किती
वाजता उघडेल असे
विचारले. त्यावर ते म्हणाले, "मंदिर कधीच बंद होत नाही, चोवीस तास उघडे असते." सकाळी रुद्रपाठ करण्यासाठी त्यांची परवानगी घेतली,
त्यांनीही ती मोठ्या खुशीने
दिली. अंथरुणावर येऊन
आडवा झालो आणि
झोप कधी लागली
ते कळलेही नाही.
पहाटेच डोळे उघडले तेव्हा आश्रमात थोडी-थोडी वर्दळ सुरू झाली होती. स्नान वगैरे उरकून मी मंदिरात गेलो. तिथे रुद्रपाठ केला. तेवढ्यात पुजारीही आले. त्यानंतर चहा घेतला आणि आम्ही पुढे निघालो. सत्संगी महाराजांची कुरकुर आजही चालूच होती. तिकडे फ़ार लक्ष न देता चालत राहिलो.
हा
भाग कसा वाटला,
ते जरूर कळवा.
Marathi literature, spiritual journey, Narmada Parikrama, travelogue, personal narrative, divine connection, faith
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineGuidance #FaithAndDestiny #Pilgrimage #MandavyaRishi #Shalivahan #DevotionalStory
-------------------------------
आधीचे लेख
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा :
रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
·
तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
·
तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
·
तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
·
तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
·
तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
·
तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२५ ०५:२३:०० PM
Rating:






कोणत्याही टिप्पण्या नाहीत: