शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
दहा डिसेंबर रोजी बडवाणी सोडल्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमेच्या सर्वात अवघड अशा शूलपाणीच्या
झाडीत प्रवेश केला. वीस डिसेंबर रोजी गोराकॉलनीमध्ये पोहोचलो. एकूणच, सुमारे दहा दिवस आम्हाला हा अवघड टप्पा पार करण्यासाठी लागले. आजकाल लोक म्हणतात की रस्ते झाल्यामुळे शूलपाणीचा प्रवास सोपा झाला आहे, पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. रस्त्याने जायचे झाल्यास एखाद्या ठिकाणी पोहोचायला पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते, तर पायवाटेने तोच टप्पा एका किलोमीटरमध्ये पार करता येतो. रस्त्यांमधील चढ-उतार आहेतच. त्यामुळे शूलपाणीचा प्रवास आजही तसा अवघडच आहे.
शिवाय, या भागात फार मोजके आश्रम आहेत. राहण्याची सोय नीट होईलच असे नाही, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. या भागातील नागरिकांमध्ये परिक्रमावासींविषयी प्रचंड आपुलकी असली तरी त्यांचे दारिद्र्य सेवा करण्यामध्ये मोठी आडकाठी ठरते. असे असले तरी, ते वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दाराशी आलेल्या परिक्रमावासीला
जे असेल ते खायला घालतात.
या प्रवासातील काही अनुभव मनाला स्पर्श करणारे होते. एक खडा डोंगर चढून गेल्यानंतर डोंगर माथ्यावर एकच घर होते. बाहेर एक चटई टाकली होती आणि काही परिक्रमावासी तिथे थांबले होते. आम्हीही थांबलो. बाहेर दोन लहान मुले खेळत होती, एक अडीच-तीन वर्षांचे आणि दुसरे चार-पाच वर्षांचे. घरातून एक माई तांब्यात काळा चहा घेऊन आली. तिने सर्वांना चहा दिला. ती आमच्याशी बोलत थांबली. समोर एक छोटेसे मंदिराच्या घुमटीसारखे बांधकाम अर्धवट अवस्थेत होते.
मी सहज विचारले, 'हे मंदिराचे बांधकाम आहे का?'
त्यावर ती म्हणाली, 'नाही, माझ्या पतीची समाधी आहे.'
तिच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. ती दोन लहान मुले तिचीच होती. समोर असलेल्या एकरभर मक्यावर त्या तिघांना जगावे लागणार होते. तशाही अवस्थेत ती परिक्रमावासींची सेवा करत होती. जवळपास एकही घर नव्हते, शेजारी कोणी नव्हते. फक्त ती आणि तिची दोन लहान मुले. हा अनुभव पाहून मन हेलावून गेले.
शूलपाणीच्या झाडीत खूप जुना आश्रम अशी ख्याती असलेल्या फोदल्या गारदा पावरी यांच्या आश्रमात आमचा मुक्काम झाला. एक छोटेसे घर आणि त्यापुढे कुडाचे एक छोटेसे छप्पर म्हणजे तो आश्रम. आम्ही पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती आणि आधीच आश्रमात गर्दी होती. फोदल्या पावरी आजारी होते. त्यांचा जीर्ण झालेला देह एका खाटेवर विसावला होता. दम्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या खाटेशेजारी मोठे ओंडके पेटवून धुनी पेटवून ठेवली होती, पण कुडाच्या भिंतींना असलेल्या फटीतून येणारा गार वारा त्यांच्या कष्टात अधिकच भर घालत होता.
रात्री खिचडीची भोजनप्रसादी
मिळाली. त्यानंतर आम्ही अंथरुणावर विसावलो. तेवढ्यात फोदल्या पावरी यांची बहीण आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी
आले. भावाची स्थिती पाहून बहिणीला अश्रू आवरले नाहीत. रात्री उशिरा ते सर्व निघून गेले. या सर्व गोष्टींचा विचार करता करता मला कधीतरी झोप लागली.
आश्रमाबाहेर ट्रॅक्टरने ओढून आणलेला पाण्याचा टँकर भरून ठेवला होता. त्या पाण्याने सकाळी स्नान करून आम्ही पुढे निघालो. खडा डोंगर चढून वर आलो. दमछाक झाली होती. वाटेत एक पंधरा-सोळा वर्षांची मुलगी पाण्याची कळशी घेऊन बसली होती. डोंगर चढून आलेल्या परिक्रमावासींना ती पाणी पाजत होती. तिला सहज विचारले, 'पाणी कुठून आणलेस?' तर तिने किमान दोन किलोमीटर अंतरावरून ते पाणी आणले असल्याचे समजले. तिला अक्षरशः साष्टांग नमस्कार करावा असे वाटले. आम्हा परिक्रमावासींपेक्षाही खरी पुण्यवान तीच होती.
शूलपाणीचे जंगल आता जंगल राहिलेले नाही. उघडे-बोडके डोंगर आणि प्रचंड चढ-उतार, अवघड वाटा असा हा सारा परिसर आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी आम्ही मध्यप्रदेशातील
भादलमध्ये नक्करसिंग सोलंकी यांच्याकडे बालभोग घेतला. तिथून पुढे निघून महाराष्ट्रातील भादलमध्ये असलेल्या काळुराम वर्मा यांच्या आश्रमात रात्री मुक्काम केला. आम्ही खप्परमाळ येथे श्री उत्तम सेवाधाम या आश्रमात दुपारी बारा वाजता पोहोचलो. महर्षी उत्तम यांनी हा आश्रम उभारल्यामुळे परिक्रमावासींची सोय झाली आहे. दुपारी बारा वाजता या आश्रमात सोसाट्याचा वारा आणि कडाक्याची थंडी होती. भोजनप्रसादीला थोडा वेळ होता, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो. या आश्रमात बाजूच्या वस्तीमधील छोट्या मुलांना शिक्षण दिले जाते आणि भोजनही दिले जाते. हा उपक्रम अतिशय चांगला आहे.
दुपारी भोजनप्रसादी
घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो. डोंगर उतरून खाली येईपर्यंत अंधार होऊ लागला होता. मग भमाणा येथे रस्त्याच्या कडेला एका घरात आश्रय घेतला. हे घर कालशा पावरा यांचे. त्यांची पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा संसार होता. फॉरेस्टच्या
हद्दीत नदीकिनारी असलेल्या दोन-अडीच एकरावर मका वगैरे जे काही पिकेल त्यावर वर्षभर गुजराण करावी लागते.
आम्ही येथे पोहोचलो, तेवढ्यात तिथे एक माई आणि एक तरुण परिक्रमावासी
मुलगा आले. त्या माई म्हणजे पुण्याच्या पोलीस खात्यात असलेल्या अर्चना काळे. त्यांचा पहिल्यांदा परिचय तिथे झाला. आम्ही पुण्याकडचे म्हटल्यावर आणि आमच्यासोबत सत्संगी महाराज पूर्वाश्रमीचे
पोलीस इन्स्पेक्टर असल्याने आमच्यात छान गप्पा झाल्या. अर्चनाताईंनी परिक्रमेसाठी
९० दिवसांची रजा घेतली होती. त्यांनी चहा घेतला आणि त्या इथे मुक्कामाला न थांबता पुढे निघून गेल्या.
आम्ही मात्र कालशा पावरा यांच्याकडेच थांबलो. सायंपूजा आटोपली. तेव्हा पावरा यांनी भोजनात कांदा-लसूण चालेल का, असा प्रश्न केला. मुळातच एवढी गरिबी आणि ते अशाही अवस्थेत आमची सेवा करू पाहत असल्यामुळे आम्ही त्यांना, 'तुम्हाला जे शक्य होईल ते द्या, आम्ही ते मैयाचा प्रसाद म्हणून ग्रहण करू,' असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कांदा-लसूणविरहित तुरीच्या डाळीची आमटी आणि मक्याच्या गरमागरम भाकरी असे भोजन आम्हाला दिले. नवले महाराजांनी 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून कालशा पावरा यांना यथाशक्ती मदत केली.
दुसऱ्या दिवशी तिथून निघून आम्ही बिलगाव उंबरपाणी येथे नर्मदा निरंजनी गोरक्षनाथ धुना फाउंडेशनच्या आश्रमात पोहोचलो. १६ डिसेंबरला धनाजे येथील श्री नर्मदा शंकर आश्रमात थोडा वेळ आराम करून सायंकाळी धडगाव येथे पोहोचलो. तिथे एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. पण ती सांगतो पुढच्या भागात.
Marathi
literature, spiritual journey, Narmada Parikrama, travelogue, personal
narrative, divine connection, selfless service, human spirit, Shulpani jungle
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #Shulpani #SelflessService #HumanSpirit #Pilgrimage #DevotionalStory #ActsOfKindness #NarmadaMaiya
------------------------------
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा :
रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा :
शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा :
खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
----------------------------------
अस्त्र न्यूज नेटवर्कला
सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा
वेबसाईट: https://www.astranewsnetwork.in
फेसबुक पेज : https://www.facebook.com/astranewsnetwork
ट्विटर : https://twitter.com/ANN35178142
यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/channel/UCS9Ua24djq0k0VjwqE9YS-g
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/Astra_news_network
----------------------------------------
व्हाट्सअप ग्रूप लिंक https://chat.whatsapp.com/CoTUVk1lAm5JcAnfeG6dpx
-------------------------------------------------
नमस्कार
आपणाला आमच्याकडून
दिवसातून एकदा महत्वाच्या बातम्या वाचायला आवडणार असेल तर कृपया हा फ़ॊर्म भरून पाठवा.
फ़क्त एक मिनिट लागेल. धन्यवाद! 👉 whatsform.com/14ZWE_
---------------------------------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
·
तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
·
तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
·
तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
·
तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
·
तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
·
तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: