शूलपाणी:
एक अदृश्य
परीक्षा आणि अनपेक्षित मदत
आठ डिसेंबर २०२४, सकाळी आम्ही खलबुजुर्ग येथील सद्गुरू जोग महाराज आश्रमातून निघालो. चिंचलीतील खेडापति हनुमान मंदिर आणि भोईंदा येथील संकटमोचन हनुमान मंदिरात थोडा विसावा घेतला. त्यानंतर ब्राह्मणगावमार्गे जाऊन मंडवाडा येथील शिवमंदिरात रात्रीचा मुक्काम केला.
भोईंदा येथून निघताना
एक गमतीदार घटना घडली ती आधी सांगतो.
तेथून निघताना मी मारुतीरायाला सहज हात जोडले आणि गंमत म्हणून म्हणालो तू पण चल
माझ्या बरोबर. माझ्याकडे दोन बॅगा असल्यामुळे मी सर्वांच्या मागे पाय ओढत चालत
असे. पण यावेळी काय झाले काय माहीत. माझी चालण्याची गती अचानक वाढली. मी वेगाने
पुढे निघून गेलो. बाटेत दोन ठिकाणी चायप्रसादीसाठी बोलावले तिथे थांबलो. बडवानी
जवळ आल्यावर रस्त्याच्याकडेला एका कट्ट्यावर थोडावेळ बसून आराम केला. पण; नवले
महाराज आणि सत्संगी महाराज दिसत नव्हते, मोबाईलला नेटवर्कही नव्हते. अखेरीस मी
बडवानी शहरात जो पहिला चौक लागला तेथे जाऊन त्यांची वाट पहात बसलो. तितक्यात
मोबाईलची रिंग वाजली. नवले महाराजांचा कॊल होता. त्यांनी विचारले; तुम्ही कुठे
आहात? मी म्हटले बडवानीमध्ये चौकात वाट पहातोय ते थोड्यावेळाने तेथे पोहोचले.
त्यांना वाटत होते मी मागेच कुठेतरी रेंगाळतोय. ही घटना मी जेव्हा श्री मैंद यांना
सांगितली. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, मारुतीरायाने जादू दाखवली....
तर दहा डिसेंबरला आम्ही बडवाणी येथे पोहोचलो. इथे सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थानमध्ये
आमचा मुक्काम झाला. बडवाणी हे जिल्ह्याचे शहर असून, नर्मदा परिक्रमेच्या मार्गावरील अवघड शूलपाणी झाडीचा टप्पा सुरू होण्यापूर्वीचे हे सर्वात मोठे गाव आहे.
मी माझ्याकडील दोन मोठ्या बॅगांमुळे खूप हैराण झालो होतो. परिक्रमेसाठी घेतलेला दंड खांद्यावर टाकून त्यावर बॅग अडकवून चालावे लागत होते. आतापर्यंतचा रस्ता फारसा अवघड नव्हता, पण यापुढे शूलपाणीची झाडी सुरू होणार होती. आता काय करायचे, हा प्रश्न मला सतावत होता. नवले महाराज म्हणाले, 'तुम्हाला आता नवीन बॅग घ्यावीच लागेल. नाहीतर शूलपाणीतील अवघड डोंगरदऱ्यांतून
चालणे शक्य होणार नाही. आपण बडवाणीमध्ये
नवीन बॅग घेऊ.'
दहा तारखेला सायंकाळी आम्ही बडवाणीच्या सिद्धेश्वर मंदिरात पोहोचलो. या आश्रमात नेहमीच प्रचंड गर्दी असते, पण व्यवस्थापन इतके सुरेख आहे की कोणतीही अडचण येत नाही. आम्ही आसने लावली आणि चालून थकून आलेल्या सत्संगी महाराजांना तिथेच थांबायला सांगून नवले महाराज आणि मी नवीन बॅग घेण्यासाठी बाहेर पडलो. मार्केटमध्ये फिरता फिरता एका दुकानातून सैनिकांकडे असते तशा एका मोठ्या पोत्यासारख्या
बॅगची खरेदी केली.
ती बॅग घेऊन आम्ही आश्रमात परत आलो. या आश्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की येथे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येत असतात. कोणी अॅक्युप्रेशरच्या साहाय्याने पायावर उपचार करतात, तर कोणी डॉक्टर औषधे, गोळ्या देऊन मदत करतात. एक सेवाधारी सज्जन परिक्रमावासींच्या बॅगांचे तुटलेले पट्टे आणि खराब झालेल्या चेन बदलून देण्याचे काम निशुल्क करत होते.
आम्ही परतलो तेव्हा ते 'कोणाच्या बॅग दुरुस्त करायच्या आहेत का?' अशी विचारपूस करत फिरत होते. माझ्याकडे असलेल्या सॅकची चेन कापडी पट्टीत अडकली होती, ती त्यांनी सोडवून दिली. आता माझ्याकडे मोठी बॅग आल्यामुळे ती सॅक कोणा गरजूला देऊन टाकावी असा विचार माझ्या मनात आला. मी त्या सेवाधाऱ्यांना
म्हटले, की 'ही सॅक कोणाला हवी असेल तर विचारा. मी नवीन बॅग घेतली आहे.'
तेव्हा त्यांनी माझ्या नव्या बॅगकडे नुसती नजर टाकली आणि म्हणाले, "ही तुमची नवीन बॅग कुचकामी आहे. तुम्ही सॅक कोणालाही देऊ नका. ही तुमची नवीन बॅग पुढच्या प्रवासात तुटणार आहे."
आम्ही गप्प बसलो. त्यांच्या सांगण्यानुसार,
मी माझी सॅक देण्याचा विचार रद्द केला. नवीन बॅगमध्ये माझी सॅक टाकून दिली. दंडाला अडकवून खांद्यावर घेतलेले ओझे पाठीवर आल्यामुळे बरे वाटत होते, पण पुढे शूलपाणीचे जंगल आमची परीक्षा पाहणार होते.
निसर्गाची परीक्षा
आणि माणसांचा
चांगुलपणा
११ डिसेंबरला सकाळी आम्ही बडवाणीतून बाहेर पडलो. शहरातून दोन-तीन किलोमीटर बाहेर आल्यावर सत्संगी महाराज लघुशंकेसाठी थांबले. त्यांनी आपली मैयाची पिशवी एका झाडावर अडकवून ठेवली आणि ती तिथेच विसरून ते आमच्याबरोबर चालू लागले.
सुमारे एक-दोन किलोमीटर पुढे आल्यावर मागून एक तरुण मोटरसायकलवाला आणि त्याची धाकटी बहीण आले. त्यांनी आम्हाला थांबवून सत्संगी महाराजांच्या
हातात त्यांची मैयाची पिशवी दिली आणि म्हणाले, 'महाराज, तुम्ही मघाशी जिथे थांबला होतात, तिथेच पिशवी विसरून आलात.' सत्संगी महाराजांनी पिशवी घेतली, त्यांचे आभार मानले. ते निघून गेल्यावर, सत्संगी महाराजांनी रडण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांची समजूत काढत 'आता शांत व्हा, पिशवी मिळाली ना परत' असे सांगत त्यांना सोबत घेऊन चाललो.
त्या दिवशी आम्ही बोरखेडीला अन्नक्षेत्रात
मुक्काम केला. भरपूर गर्दी होती, जागा अपुरी पडत होती. चारी बाजूने उघड्या असलेल्या एका पत्र्याच्या
शेडमध्ये आम्ही आसने लावली. आश्रमासमोरच रात्री मुक्कामाला आलेली एक बस थांबली होती. पहाटे अचानक धावपळ सुरू झाली. एका महिलेला दोन-तीन धडधाकट माणसे हातावर उचलून घेऊन आली आणि तिला बसमध्ये ठेवले. समजले की ती महिला परिक्रमेत होती, पण शूलपाणीतील अवघड पायवाटेवर तिचा तोल जाऊन पडली आणि; तिचा पाय मोडला. झाडीतील नागरिकांनी तिला कसेबसे बोरखेडीपर्यंत आणले होते. तिला उपचारासाठी बडवाणीला नेले जाणार होते.
या घटनेमुळे वाईट वाटले, पण त्याचबरोबर झाडीतील नागरिकांबद्दल
आदरभाव दुणावला. एकेकाळी जिथे परिक्रमावासींची लूट होत होती, अंगावरील कपडेही काढून घेतले जात होते, तिथे आता त्यांची सेवा होत आहे. याचे श्रेय घोंगसा येथील थोर संत लखनगिरी महाराज यांना जाते. त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून ही परिस्थिती बदलली.
या गडबडीमुळे आमची झोप उडाली. जवळच मय्याचे बॅकवॉटर होते. त्यात स्नान केले, पूजा केली आणि चहा घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. या मार्गावर वसलेले कुली हे बससेवा असलेले शूलपाणीच्या
झाडीतील शेवटचे गाव आहे. तेथे आम्ही पोहोचलो. घोंगसा येथे असलेल्या लखनगिरी महाराजांच्या
आश्रमाला भेट दिली. आश्रमाचे महंत नर्मदागिरी महाराजांना नमस्कार केला. लखनगिरी महाराजांची समाधी आता नर्मदेच्या बॅकवॉटरमध्ये
गेली आहे. वरचा काही भाग दिसत होता, दुरूनच त्यांच्या समाधीला हात जोडले.
दुपारची भोजनप्रसादी
घेऊन आम्ही पुढे निघालो. त्या दिवशी आमचा मुक्काम सेमलेट येथे पडला. तेथील सरपंच आणि किराणा दुकानदार सदावर्त देतात. येथील धर्मशाळेत इतकी गर्दी झाली होती की आसने लावायला जागाच नव्हती. शेवटी आम्हाला बाजूच्या शाळेतील एक वर्ग उघडून देण्यात आला. तिथे आम्ही आमची आसने लावली. सदावर्त असल्यामुळे स्वयंपाक करणे आवश्यक होते. पण, आमच्याकडे भांडी नव्हती आणि एकच चूल होती. त्यावर स्वयंपाक करणाऱ्यांची
मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही स्वयंपाक करण्याचा बेत रद्द करून आमच्याकडे असलेल्या खाद्यपदार्थांवर ती रात्र काढली. सकाळी लवकर उठून आम्ही पुढे निघालो.
Marathi
literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, personal
narrative, divine connection, selfless service, Shulpani jungle
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #Shulpani #FaithAndDestiny #Pilgrimage #DevotionalStory #Humanity #Transformation #NarmadaMaiya
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा :
रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा :
शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा :
खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
·
तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
·
तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
·
तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
·
तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
·
तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
·
तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
·
तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: