३ आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
मागील
लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, एका
अदृश्य शक्तीने माझ्या
नर्मदा परिक्रमेचा मार्ग
कसा स्पष्ट केला,
याची जाणीव मला
झाली होती. आता
त्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीची एक
महत्त्वाची गोष्ट सांगायलाच हवी.
ही एक उपकथा
आहे, जी मुख्य
कथेशी जोडलेली आहे.
हे
सगळे घडण्यापूर्वी काही
वर्षांपूर्वी, माझे मित्र श्री.
जगताप यांनी मला
भूत-भविष्य जाणणाऱ्या एका
व्यक्तीबद्दल सांगितले. माझी उत्सुकता वाढली.
"आपल्याला त्या
व्यक्तीला भेटता येईल का?"
मी विचारले. जगताप
म्हणाले, "हो, नक्कीच." आणि त्यांनी माझी
गाठ श्री. मैंद यांच्याशी घालून
दिली. मैंद हे
स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त
आहेत. त्यांना एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ
आणि भविष्यकाळ कळतो.
त्यांना भारतीय
रसशास्त्रामध्येही
विशेष रुची होती.
माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे मीही
त्यातील काही गोष्टी आत्मसात केल्या
होत्या. त्यामुळे त्यांच्याशी परिचय
झाल्यावर लवकरच आमची चांगली
मैत्री झाली. सुट्टीच्या दिवशी
त्यांना भेटून गप्पा मारणे
हा आमचा नेहमीचा कार्यक्रम झाला.
एक
दिवस त्यांनी मला
आणि आणखी चार
मित्रांना त्यांच्या घरी बोलावले. तिथे
त्यांनी आम्हाला स्वामी समर्थांच्या प्राणप्रतिष्ठित मूर्ती
दिल्या. अशाप्रकारे, स्वामींनी या
बालकाचा ताबा घेतला. तत्पूर्वी मी
शेगावच्या गजानन महाराजांचा भक्त
होतो, आणि आजही
आहे. पण आता
स्वामींनीही माझी काळजी घ्यायला सुरुवात केली
आहे. त्यामुळे माझी
अवस्था 'त्वमेव माता,
पिता त्वमेव' अशी
झाली आहे.
दरम्यान, काही
काळ मैंद यांच्याशी माझी
भेट झाली नव्हती.
अचानक जगताप यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले, की
मैंद परदेशात असताना
एका स्पोर्ट्सबाइकने त्यांना धडक
दिल्याने ते गंभीर जखमी
झाले असून सध्या
अंथरुणाला खिळले आहेत. ही
बातमी ऐकून मी
दुसऱ्याच दिवशी त्यांना भेटायला गेलो.
अपघातात त्यांच्या पेल्व्हिस बोनचे अक्षरशः तीन
तुकडे झाले होते
आणि त्यांच्यावर मोठी
शस्त्रक्रिया झाली होती. वेदना
असह्य होत्या.
त्यांची विचारपूस केल्यानंतर सहज
गप्पांच्या ओघात मी त्यांना माझ्या
नर्मदा परिक्रमेचा विचार
बोलून दाखवला. हे
ऐकून त्यांना अतिशय
आनंद झाला. त्यांनी परिक्रमा यशस्वी
होण्यासाठी मला मनापासून आशीर्वाद दिला.
त्यावेळी त्यांनी मला
मारुतीरायाला अर्पण करण्यासाठी एक
भगवी शाल दिली.
तसेच, त्यांच्या स्वतःच्या घरातील
एक आणि त्यांच्या बहिणीच्या घरातील
एक अशा दोन
ओट्या मय्याला अर्पण
करण्यासाठी दिल्या. या ओट्यांमुळे पुढे
काय घडले, हे
मी तुम्हाला पुढे नक्की सांगेन.
हा
भाग तुम्हाला कसा
वाटला, हे नक्की
कळवा.
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: