नारेश्वर ते रणापूर
पाच जानेवारी रोजी सकाळी आम्ही मोठी
कोरल मधून बाहेर पडलो. साधारण सहा किलोमीटरवर सायर नावाचे गाव लागले, जिथे
सागरेश्वर महादेव तीर्थ आहे. तिथे फार वेळ न थांबता आम्ही पुढे चालू लागलो.
तिथून एक किलोमीटरवर नारेश्वर
हे गाव आहे. हे दत्तसंप्रदायातील महान विभूति श्री रंगावधूत महाराज (बापजी)
यांचे स्थान आहे. येथे कपर्दिकेश्वर महादेव तीर्थ आहे.
नारेश्वर आणि सत्संगी महाराजांची 'तुटलेली बरगडी'
आम्ही नारेश्वरला पोहोचलो तेव्हा
साधारण साडेदहा वाजत आले होते. आश्रमात दर्शन घेऊन मी आणि नवले महाराज औदुंबराच्या
झाडाजवळ बसलो होतो. थोड्यावेळाने सत्संगी महाराज तिथे आले आणि कुंपणाजवळ असलेल्या
औदुंबराकडे पाहू लागले. तेवढ्यात त्यांच्याशेजारी एका माकडाने उडी मारली. त्यासरशी
यांनी घाबरून त्याच्यापेक्षा जोरात उडी मारली. या गडबडीत त्यांच्या बरगडीला
कुंपणाचा बांबू लागला. किरकोळ प्रकार असूनही, यांना लगेच आपली बरगडी तुटल्याचा
साक्षात्कार झाला!
या 'तुटलेल्या बरगडी'ची त्यांची कुरकुर पुढे बरेच दिवस सुरू होती. चालायचा कंटाळा आला की सोयीस्करपणे त्यांचे दुखणे बळावत असे. एकदा मी त्यांना म्हटले की, "इतक्या दिवसात फ्रॅक्चर सांधले जाते," त्यासरशी त्यांचे दुखणे बरे झाले!
आम्ही धर्मशाळेत थोडावेळ थांबून भोजनप्रसादी
घेतली आणि पुढे चालण्यास सुरुवात केली. सकाळी पिळलेले कपडे ओले असल्याने,
नारेश्वरमधून बाहेर पडल्यावर एका एसटी पिकअप शेडमध्ये थांबून ते वाळत टाकले.
मैय्यावरील अतूट श्रद्धा
त्या पिकअप शेडमध्ये बाजूलाच असलेल्या
गावातला एक ३५-४० वर्षांचा माणूस बसला होता. तो आम्हाला सांगत होता की, रंगावधूत
महाराजांचा या परिसरावर फार मोठा प्रभाव आहे. तो म्हणाला, "मला काही समस्या
असेल तर मी बापजींच्या समाधीसमोर बसून त्यांना सांगतो आणि पुढच्या काही दिवसात
माझा तो प्रश्न सुटलेला असतो."
मला या संदर्भात मैय्यावरील श्रद्धेचा
एक प्रसंग आठवला. आम्ही मैयाच्या किनाऱ्याने चाललो असताना एका घाटावर थोड्या
सावलीसाठी टेकलो होतो. तिथे एक मनुष्य बसला होता आणि काहीतरी बोलत होता. तो
उठल्यावर आम्ही त्याला विचारले, "बाबाजी एवढ्या उन्हात येथे काय करत
होता?" तो म्हणाला, "मुलाचे नुकतेच लग्न झाले, नवी सून घरी आली.
मय्याला ते सांगायला आलो होतो." तो पुढे म्हणाला, "आमच्या घरात काही
चांगलं, वाईट घडलं किंवा काही त्रास होत असला तर आम्ही ते मय्याला येऊन सांगतो.
आमच्या घरातल्या घडामोडी मय्याच्या कानावर घालतो." याला म्हणतात भाव,
श्रद्धा! हा भाव आमच्या अंगी येईल, त्या दिवशी परिक्रमा करण्याचीही गरज राहणार
नाही.
कपडे वाळवून आम्ही कहोना, फत्तेपूर
मागे टाकून कोठिया (चंद्रप्रभास तीर्थ) येथे पोहोचलो.
रणापूर: शंखाने अभिषेक आणि वाळूचे लेपन
दिवस मावळताना आम्ही रणापूरला
पोहोचलो. येथे कंबुकेश्वर महादेव तीर्थ आहे. जगात फक्त येथेच महादेवाला शंखाने
अभिषेक केला जातो. गावाबाहेर मैयाच्या किनारी एका नव्या आश्रमात आम्ही आसने
लावली.
सतत चालल्यामुळे आणि मनाने बरगडी
तुटल्याचे घेतल्यामुळे सत्संगी महाराजांचे डोके फिरले होते. आम्ही दोघे मैयाकिनारी
गेलो. तितक्यात सत्संगी महाराज धावत धावत आले आणि मय्याच्या पात्रात जाऊन डुबक्या
मारू लागले. बराच वेळ त्यांचे डुबक्या मारणे चालू होते. मग ते बाहेर आले आणि
मय्याची वाळू आपल्या बरगडीला चोळू लागले. आम्हाला काही कळेना. त्यांनी
सांगितले, "दुखत असलेल्या बरगडीला वाळू लावत होतो."
आम्ही आश्रमात परत आलो. थंडी चांगलीच
होती. भोजनप्रसादी घेऊन अंथरुणाला पाठ टेकवली.
रात्री माझ्या ज्या पायाच्या तळव्याला
सेप्टिक झाले होते, त्याच्यावरची खपली धरू लागली होती, तिला प्रचंड जळजळ होऊ
लागली. इतकी की मी उठून बसलो आणि शेवटी वैतागून नखाने ती खपली ओढून काढून टाकली.
तरीही जळजळ होतच होती. पहाटेच्या सुमारास माझा डोळा लागला. परिक्रमावासींची लगबग
सुरू झाल्यावर मी जागा झालो. प्रातर्विधी, स्नान, पूजा आटोपून आम्ही नर्मदे हर
करून पुढे निघालो.
Labels: Narmada Parikrama, Ranga
Avadhoot Maharaj, Nareshwar, Koral, Ranapur, Satsangi Maharaj antics, faith and
devotion, healing, spiritual journey, travelogue in Marathi
Search Description: A Marathi
travelogue section detailing the Narmada Parikrama journey from Koral to
Ranapur. Key events include the visit to Ranga Avadhoot Maharaj's holy place at
Nareshwar, Satsangi Maharaj's humorous reaction to a monkey resulting in a
self-diagnosed broken rib (and its subsequent 'cure'), the deep faith of locals
in Narmada Maiya, and the night halt at Ranapur's new ashram.
Hashtags: #NarmadaParikrama
#Nareshwar #RangaAvadhoot #DattSampradaya #SatsangiAntics #Ranapur
#Kambukeshwar #NarmadaFaith #HealingJourney #Maiya
-------------------------------
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html
नर्मदा परिक्रमा करताना....
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html
१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html
१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर: सेवेचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html
१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_23.html
१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_24.html
नर्मदाखंडातील पर्यावरण संवर्धनाचे आव्हान
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_25.html
मांडूचे चतुर्भुज श्रीराम मंदिर: आस्था, इतिहास आणि वास्तुकलेचा अनोखा संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_58.html
नर्मदा परिक्रमा मार्गावरील आश्रमात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सेवा कशी देता येईल?
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_26.html
नर्मदा खंडातल्या शब्दांमधून उलगडणारी 'माई'ची भाषा: नियमांची शिस्त नव्हे, मायेचा संवाद!
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_45.html
१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_28.html
१७ नर्मदा परिक्रमा : विमलेश्वरचा अंतिम टप्पा: माईची कृपा आणि समुद्रपार
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_30.html
१८ नर्मदा परिक्रमा : पितृभूमीकडून देवभूमीकडे
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post.html
१९ नर्मदा परिक्रमा : टीबी गावातील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post_4.html
२० नर्मदा परिक्रमा : भरूच ते दत्तमढी, भारद्वाज आश्रम: जिव्हाळा, गोंधळ आणि नवीन वर्षाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post_8.html
२१ नर्मदा परिक्रमा : भारद्वाज आश्रम ते मोटी कोरल
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post_10.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi
----------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: