विमलेश्वरचा अंतिम टप्पा: माईची कृपा आणि समुद्रपार
२९ डिसेंबरला सकाळी आम्ही बुलबुलाकुंड
येथून निघालो. बाहेर प्रचंड धुके होते आणि रस्ता नीट दिसत नव्हता. हळूहळू चालत काही किलोमीटर गेल्यावर कलम गावाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ शेडनेटने उभारलेला एक छोटासा गवालीनाथ आश्रम दिसला. रस्त्याच्या कडेला असलेल्या या आश्रमात आधीच दहा-पंधरा परिक्रमावासी
थांबले होते. आश्रमाच्या बाबाजींनी आम्हाला प्रेमाने "नर्मदे हर, चायप्रसादी पा लो भगवान" असे म्हणून बोलावले. थंडीने आम्ही कुडकुडत होतो, त्यामुळे चहाची आवश्यकता होतीच. महाराजांनी चहा आणून दिला आणि भोजन प्रसादी घेतल्याशिवाय पुढे जायचे नाही, असे बजावले.
आश्रमाच्या बाजूलाच चुलीवर तीन मय्या पोळ्या भाजत होत्या. त्यापैकी एक कलम गावातील होती. आणि दोन महाराष्ट्रातील परिक्रमावासी होत्या. सुरतहून सेवा देण्यासाठी आलेले एक बँक अधिकारीही होते. थोड्याच वेळात दोन तरुण पंधरा लिटरच्या दुधाच्या कॅनमधून दही घेऊन आले आणि त्यांनी मुसळासारखी मोठी रवि घेऊन दही घुसळून ताक करण्यास सुरुवात केली. ताकाची कढी, भाजी आणि पोळी असे भोजन अकराच्या सुमारास मिळाले. भोजनानंतर महाराजांना नर्मदे हर करून आम्ही पुढे निघालो. सर्व परिक्रमा मार्गात एक लक्षात आले. की, आश्रम जितका लहान; तितका तेथील बाबाजी आणि सेवाधारी यांच्यात जिव्हाळा जास्त!
हंसोट येथील सूर्यकुंड: श्रद्धेची उपेक्षा
पुढे आम्ही हांसोट येथे पोहोचलो. येथे पुरातन तीर्थ सूर्यकुंड आहे. दर्शनासाठी विचारत विचारत आम्ही तिकडे निघालो, पण सूर्यकुंडाकडे जाणारा रस्ता अतिशय अस्वच्छ होता. सर्वत्र घाण, दलदल, सांडपाणी रस्त्यावर आलेले होते. कसेबसे सूर्यकुंडापर्यंत
पोहोचलो. कुंडाशेजारी शिवमंदिर होते. तेथे एका छोट्या घरात एक माई आणि बाबाजी बसलेले होते. त्या बाबाजींनी सांगितले की मंदिराचे पुजारी काही महिन्यांपूर्वीच स्वर्गवासी झाले आणि त्यांची विधवा पत्नी मंदिराची व्यवस्था बघत होती. एकूणच सगळी बिकट परिस्थिती दिसत होती. सूर्यकुंडातील पाण्यावर संपूर्ण शेवाळ धरलेले होते; पाणी पूर्ण अस्वच्छ झाले होते. एवढ्या महत्त्वाच्या तीर्थस्थळाची ही अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटले. आम्ही दर्शन घेतले आणि देवासमोर काही पैसे ठेवले. जाताना ठेवलेले पैसे त्या माईला ताब्यात घेण्याची सूचना केली. तेव्हढीच मदत!
तेथून बाहेर पडून पुढच्या रस्त्याला लागलो. रस्त्यात बसस्थानक लागले. एका टपरीमालकाने आम्हाला बोलावले आणि मिल्कशेक पाजला. पुढे बराव काळ रस्त्याचा बाजूला गाव लागत नव्हते. अखेरीस एक छोटेसे गाव लागले. तेथे एका बस थांब्यावर बंद असलेल्या टपरीशेजारी लोखंडी पिंजऱ्यात पिण्याच्या पाण्याचे जार ठेवलेले दिसले. आमच्याकडचे पाणी संपले होते, त्यामुळे तिथे पाणी भरून घेतले आणि घाटरस्ता चढून बाडोदरा गावात पोहोचलो. तेथे एका टुमदार मंदिरात दर्शनासाठी गेलो. बाजूच्या कुटीमधील बाबाजींनी आम्हाला चहा दिला आणि बुलबुलाकुंड येथील व्यवस्थेबद्दल विचारले.
विमलेश्वर
आणि माईचा
अनुग्रह
चहा घेऊन आम्ही पुढे निघालो आणि हनुमान टेकडी (Hanuman Tekadi) मार्गे विमलेश्वर येथे संध्याकाळी साडेसहा-पावणेसातच्या
सुमारास पोहोचलो. दिवसभरात सुमारे ३५ किलोमीटर चालणे झाले होते. पायाला सेप्टिक झालेले असतानाही हा कठीण टप्पा पार करण्याचे बळ माईने दिले होते. सत्संगी महाराजांची कुरकुर खूप वाढली होती, पण मध्ये कुठेही थांबण्याची व्यवस्था नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे भाग होते.
विमलेश्वरमध्ये आधीच खूप गर्दी झाली होती. जेमतेम आसने लावण्यासाठी जागा मिळाली. आसने लावल्यानंतर नाव कधी सुटणार याची चौकशी केली. रात्री बाराच्या सुमारास एक नाव सुटेल असे सांगण्यात आले आणि आम्ही नावनोंदणी केली. माझ्या वाचनात समुद्र पार करण्यासाठी ५० रुपये तिकीट असल्याचे आले होते, पण आता हे तिकीट पायी परिक्रमावासींसाठी अडीचशे रुपये झाल्याचे समजले.
माझ्याकडे नेमकी तेवढीच रक्कम होती. प्रतिभाताई चितळेंच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळ पैसे बाळगायचे नाही असे ठरवले होते. त्याप्रमाणे मिळालेली दानदक्षिणा तेव्हढी माझ्या खिशात असे. तर; आधीचे माझ्याकडे जमलेले सुमारे दीडशे रुपये आणि काल पुण्याच्या माईंनी दिलेली शंभर रुपये दक्षिणा आणि असे बरोब्बर अडीचशे रुपये माझ्याकडे होते! माझ्या नावेच्या तिकिटाची सोय माईने अगदी बरोबर करून ठेवली होती. पुढेही मला असेच अनुभव अनेकदा आले.
आम्ही नावनोंदणी केली आणि पैसे भरून तयारीने बसलो. परंतु अचानक रात्री दहाच्या सुमारास घोषणा झाली की, रात्रीची नाव सुटणार नाही, उद्या सकाळी सुटेल. त्यामुळे आम्ही अंथरुणावर येऊन पडलो. सकाळी लवकर उठून स्नान, पूजा आणि विमलेश्वरमधील सुंदर देवळांचे दर्शन घेतले. चायप्रसादी, बालभोग घेऊन आम्ही आश्रमापासून सुमारे तीन किलोमीटर दूर असलेल्या जेटीकडे चालायला सुरुवात केली आणि उन्हापासून बचाव करत बांधकामाच्या आडोशाला बसलो.
उत्तर तटावर आगमन
दुपारी एकच्या सुमारास भरती सुरू झाली आणि नावाड्याने नावेमध्ये माणसे घेण्यास सुरुवात केली. पायी परिक्रमावासी म्हणून आमचा नंबर लवकर लागला. नावेमध्ये साधारण शंभर लोक असावेत. थोड्या वेळाने नावा चालू झाल्या. साधारण चार तासांचा प्रवास करून आम्ही पलीकडे मिठीतलाईला
पोहोचलो.
तिथे जेटीवर उतरल्याबरोबर एका स्वयंसेवी संस्थेने आम्हाला बालभोग दिला. तिथून चालत आम्ही मिठीतलाईच्या आश्रमात पोहोचलो. आश्रम मोठा आहे आणि तेथील महाराज महाराष्ट्रातील आहेत असे समजले. आम्ही एका कक्षामध्ये आसने लावली, कपडे वगैरे धुवून वाळत टाकले. सायंपूजा आटोपली. थोड्या वेळाने भोजन झाले आणि आम्ही निद्राधीन झालो. उद्यापासून उत्तर तटावरील वाटचाल सुरू होणार होती.
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html
नर्मदा परिक्रमा करताना....
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html
१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html
१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर: सेवेचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html
१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_23.html
१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_24.html
नर्मदाखंडातील पर्यावरण संवर्धनाचे आव्हान
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_25.html
मांडूचे चतुर्भुज श्रीराम मंदिर: आस्था, इतिहास आणि वास्तुकलेचा अनोखा संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_58.html
नर्मदा परिक्रमा मार्गावरील आश्रमात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सेवा कशी देता येईल?
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_26.html
नर्मदा खंडातल्या शब्दांमधून उलगडणारी 'माई'ची भाषा: नियमांची शिस्त नव्हे, मायेचा संवाद!
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_45.html
१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_28.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: