२१ डिसेंबर रोजी सकाळी आम्ही गोराकॉलोनी येथील हरिधाम आश्रमातून निघालो. बसंतपुरा, इंद्रवरुणा मार्गे चालत नानी रावल येथे पोहोचलो. इथे मैयाच्या किनाऱ्यावर एक पुरातन देवस्थान आहे—व्यासेश्वर महादेव. ही व्यास ऋषींची तपस्थळी आहे. त्यांनी स्थापन केलेले शिवलिंग येथे आहे, तसेच देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनीही येथे तपश्चर्या केली होती. त्यांचीही छोटी मंदिरे इथे होती. परंतु, २०२३ साली आलेल्या महापुरात या मंदिरांच्या समूहाची मोठी हानी झाली. अश्विनीकुमार यांचे मंदिर एका बाजूला कलले आहे, तर व्यासेश्वर महादेवाचे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून केवळ शिवलिंग शिल्लक उरले आहे.
आम्ही दर्शन घेतले. त्या मंदिराची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. या मंदिर समूहाचा जीर्णोद्धार
होणे आवश्यक आहे. तिथून पुढे निघालो. फुलवाडी मार्गे रामपुरा येथील योगानंद तीर्थ आश्रमात पोहोचलो. तिथे थोडा विसावा घेतला, दुपारची भोजनप्रसादी घेतली आणि पुढे निघालो. धनदेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. या ठिकाणी मला पुन्हा पुण्याचे विश्वास करंदीकर भेटले. त्यांच्याकडे बासरी होती आणि प्रत्येक मंदिर व आश्रमात पोहोचल्यानंतर
ते बासरी वादन करत असत.
तपोवन
आश्रम: शांतता
आणि पावित्र्याची अनुभूती
आम्ही धनदेश्वरमधून
निघालो आणि गुवार येथे पोहोचलो. सायंकाळ होत आली होती. तपोवन आश्रम या अतिशय सुंदर आश्रमात आम्ही आमची आसने लावली. आश्रमात कमालीची शांतता होती. तिथे पोहोचल्यावर लगेचच आम्हाला चहाचा प्रसाद देण्यात आला. हा आश्रम मैयाच्या किनाऱ्यावर असून त्याला स्वतःचा एक अत्यंत सुंदर घाट आहे. वरती ठिकठिकाणी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे, जिथे आपण आपोआपच अंतर्मुख होऊन जातो.
या आश्रमाचे महाराज कायम त्यांच्या कक्षात ध्यानस्थ असतात. ठराविक दिवशीच त्यांचे दर्शन होते. त्यांचा दर्शनाचा वार नसल्यामुळे आम्हाला त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु, आश्रमातील अन्य महाराज आणि सेवेकरी खूपच चांगले होते. सायंकाळी आम्ही मैयाच्या घाटावर जाऊन सायंपूजा केली आणि दीपदान केले. धरणातून पाणी सोडले जात असल्यामुळे पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे पात्रात सोडलेले दिवे पाच-दहा मिनिटांतच खूप दूरवर गेले. त्यांच्या ज्योती दूरवर दिसत होत्या. रात्री मंदिरातील आरतीत सहभागी झालो. त्यानंतर भोजन घेऊन विश्राम केला. या आश्रमात अत्याधुनिक सोयी होत्या—थंड आणि गरम पाण्याची सोय, तसेच अतिशय स्वच्छ स्नानगृहे आणि स्वच्छतागृहे होती. परिक्रमा मार्गावरील हा एक 'फाइव्ह-स्टार' आश्रमच म्हणावा लागेल.
कुंभेश्वर
ते मेघनाद:
एक दैवी
अनुभव
सकाळी आम्ही तपोवन आश्रमातून निघालो आणि शराव, बांदरीया, बांधल्या मार्गे कुंभेश्वर
जवळील आश्रमात पोहोचलो. इथून कुंभेश्वर हे महत्त्वाचे तीर्थस्थान सुमारे दोन किलोमीटरवर आहे. आम्ही आश्रमात आसन लावले आणि कुंभेश्वरला निघालो.
कुंभेश्वरला शनि महाराजांचे स्थान असून, 'नानी' आणि 'मोठी पनोती' यांचे हे स्थान आहे. याशिवाय, स्वामी समर्थांनी चंदुलाल महाराज सोमण यांना प्रसाद म्हणून दिलेल्या पादुका येथे आहेत. त्यांचे दर्शन घेतले. येथे असलेल्या कालभैरव मंदिराची व्यवस्था चंदुलाल महाराज सोमण यांचे चिरंजीव पाहतात. त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. त्या दिवशी एक महत्त्वाचा योग होता, ज्यामुळे ठराविक वेळेत भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देणे अतिशय पुण्यप्रद मानले जात होते. आम्ही त्या ठिकाणी अर्घ्य देऊन दर्शन घेतले आणि आश्रमात परतलो.
कुंभेश्वरजवळच रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर अशी राम आणि लक्ष्मणाने स्थापन केलेली पुरातन तीर्थे आहेत. परंतु, मंदिरांची अवस्था अत्यंत बिकट आहे. एकेकाळी त्या ठिकाणी मोठा आश्रम किंवा बांधकाम असावे, पण ते सगळे आता ढासळले आहे आणि मंदिरे विपन्नावस्थेत
आहेत. ही जागा महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाशी
जोडलेली असल्याचे समजले. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या एका शिष्याला बेलाचे पान हातात घेऊन त्या मार्गावरून जाण्यास सांगितले होते. 'जेथे हे पान सोन्याचे होईल, तेथे शिवलिंगे आढळतील, त्यांची पूजाअर्चा कर,' असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्या शिष्याला येथे ही शिवलिंगे आढळली. कालांतराने हे मंदिर विपन्नावस्थेत का गेले, याचा इतिहास नीट कळला नाही.
त्या ठिकाणी एक वृद्ध बाबाजी राहतात. त्यांच्याशी बोलून नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिला आणि मेघनाद या तीर्थाचे दर्शन घ्या असे सांगितले. त्यांनी दुरून दिसणारा कळसही दाखवला. ते मंदिर जवळच दिसत होते, म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो. पण पुढे गेल्यावर रस्ताच नव्हता. आम्ही विचार करत उभे असतानाच शेजारच्या बंगल्यातून एक बाबाजी बाहेर आले. त्यांनी सांगितले, की 'मेघनादला जाण्यासाठी इथून रस्ता नाही. पुढे सुमारे साठ फूट खोल दरी आहे. तिथे जाण्यासाठी सुमारे साडेतीन किलोमीटरचा वळसा मारावा लागेल.' त्यांनी आम्हाला आत बोलावून चहा दिला आणि प्रत्येकी दहा रुपये दक्षिणाही दिली.
मेघनाद
येथील मुक्काम
आम्ही आश्रमात परतलो आणि दुपारची भोजनप्रसादी
घेतल्यानंतर पुढे निघण्याचा निर्णय घेतला. पुढे गेल्यावर 'मेघनाद तीर्थाकडे' असा एक बोर्ड दिसला. आम्ही त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढे निघण्याचा विचार केला आणि आतमध्ये चालू लागलो. रस्त्यापासून आतमध्ये सुमारे दोन-अडीच किलोमीटर गेल्यावर ते मंदिर लागले. मंदिराच्या सभोवती घनदाट झाडी, भरपूर बेलाची झाडे, मोर आणि माकडे होती. मैयाच्या किनाऱ्यावर असलेल्या उंचवट्यावर हे मंदिर आहे. अगदी किनाऱ्याला लागून, पण उंचावर एक यज्ञशाळाही आहे.
मंदिराजवळील एका छोट्याशा निवासामध्ये मंदिराचे पुजारी त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या पत्नीसह राहतात. दोन्ही मुले मोठी आहेत, एक महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. हे मंदिर इतके आतमध्ये आहे की सहसा तिथे कोणी जात नाही. आम्ही तिथे पोहोचल्यावर तेथील महाराजांनी आम्हाला चहा दिला. महाराज थोडेसे अलिप्त वाटत होते, जणू आम्ही तिथे आलेले त्यांना फारसे आवडले नव्हते. आम्ही निघण्याची तयारी करत होतो, तितक्यात त्यांच्या मनात काय आले कोणास ठाऊक, ते म्हणाले, "आज तुम्ही येथे थांबा."
वास्तविक, साडेचार वाजले होते आणि पुढे जाणे योग्य ठरले असते, पण आम्ही तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी आम्ही सायंपूजा करत असताना महाराज आमच्या मागे बसून आम्ही काय करतो, याचे निरीक्षण करत होते. त्यानंतर त्यांचा दृष्टिकोन अचानक बदलला. ते खूप मोकळेपणाने बोलले. त्या दिवशी अष्टमी होती. महाराजांच्या चिरंजीवांनी यज्ञशाळेत अष्टमीचे हवन केले.
एकंदर परिस्थिती पाहता, आम्ही महाराजांना 'आम्हाला भोजन वगैरे काहीही नको, आम्ही रात्री आमच्याकडे जे आहे ते घेऊ आणि उद्या सकाळी येथून निघू' असे म्हटले. त्यावर महाराज म्हणाले, "आपको भोजन तो बढीया मिलेगा।" एकूणच महाराज आता खुशीत दिसत होते.
त्या रात्री महाराजांच्या
सौभाग्यवतीने आम्हाला त्या घनदाट जंगलात अक्षरशः पंचपक्वान्नांचे भोजन वाढले. 'मैयाची इच्छा.' तिच्या मनात केव्हा काय येईल आणि ती कधी आपल्याला काय देईल, हे काहीही सांगता येत नाही. रात्री महाराज बोलता बोलता म्हणाले, "या परिसरात मैयाच्या इच्छेशिवाय कुणीही येत नाही. रात्री मुक्कामाला तर अजिबात थांबत नाही. गेल्या कित्येक दिवसांत असे कोणी थांबलेले नाही. तुम्ही पहिलेच आहात."
आम्ही त्या रात्री यज्ञशाळेत, मैयाच्या कुशीत आसने लावली. महाराज खूपच खुशीत होते. त्यांनी खूप आग्रह केला, 'उद्या तुम्ही थांबा. मी दूध मागवतो, आपण महादेवावर रुद्राभिषेक करू.' परंतु नुकतीच परिक्रमा सुरू केली होती. असे जागोजागी थांबावे लागले तर ती पूर्ण कशी होणार, म्हणून महाराजांची समजूत काढली. 'एकदा खास तुमच्याकडे येऊ, त्यावेळेस रुद्राभिषेक
करू' असे सांगून आम्ही निद्राधीन झालो.
पहाटे लवकर उठून स्नान, पूजा केली. माताजींनी पहाटेच उठून आमच्यासाठी चहा, पोहे तयार केले होते. बालभोग घेऊन 'नर्मदे हर' केले आणि पुढे निघालो. वाटेत काही गावकरी भेटले. त्यांनी नर्मदे हर करून रात कहां रुके थे
बाबाजी? असा प्रश्न विचारला. आम्ही म्हटले; मेघनाद मंदिरमे! तर ते म्हणाले, अरे,
तो आपको बडी असुविधा हुई होगी वो बाबा किसिको खडा तक नही करता. आम्ही म्हणालो; नही
जी हमको तो पंचपकवान खिलाये उन्होने. आज छोडने को तय्यार ही नही थे. त्या
गावकरयांना याचे आश्चर्य वाटले. आम्ही पुढे चालू लागलो.
Marathi
literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, divine
synchronicity, ancient temples, introspection, miraculous events
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DevotionalStory #AncientTemples #DivineGuidance #Miracle #Humility #TapovanAshram #NarmadaMaiya
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html
नर्मदा परिक्रमा करताना....
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: