२० नर्मदा परिक्रमा : भरूच ते भारद्वाज आश्रम: जिव्हाळा, गोंधळ आणि नवीन वर्षाची सुरुवात
३
जानेवारी, नवीन वर्षात, आम्ही
सकाळीच भरूचहून निघालो.
बाहेर पडतानाच सुवा
गावात भेटलेल्या ब्रिटिश परिक्रमावासी गाय डेनची पुन्हा
भेट झाली. माझ्या
खांद्यावरील मोठ्या सॅककडे पाहून
तो हसला आणि
म्हणाला, "तू आता सैनिकासारखा दिसतोस,
पण पाठीवरचे ओझे
खूप मोठे आहे."
मीही हसलो.
भरूच
शहर मोठे असल्याने शहरातून बाहेर
पडायला किमान चार-पाच किलोमीटर चालावे
लागले. या टप्प्यात परिक्रमावासींवर सेवेचा अक्षरशः वर्षाव झाला.
रस्त्याच्या कडेला एका मंदिरात बाबाजींनी चायप्रसादी दिली,
एका दुकानदाराने बिस्किटांचे पुडे
दिले. त्यानंतर गणवेशात असलेल्या एका
महाविद्यालयीन
विद्यार्थिनीने
(मय्याने) अत्यंत आग्रहाने बिस्किटे, नमकीन
आणि पाण्याची बाटली
दिली. तिची आपुलकी
इतकी होती की,
'आम्ही तिच्या कुटुंबातलेच आहोत'
असे वाटले. तिने
दिलेली पाण्याची बाटली
मला खूप उपयोगी
पडली, जी मी
अर्ध्याहून अधिक परिक्रमेत वापरली
आणि परतताना सोबत
आणली. परिक्रमेत असताना ज्या वस्तूंनी मार्गात
आलल्याला साथ दिली असते त्या निर्जीव वस्तूंविषयीही
एक जिव्हाळा निर्माण होतो,
हे मला जाणवले.
तवरा गावातील अनपेक्षित भोजनप्रसादी
भरूच
शहरातून बाहेर पडल्यावर एका
हायवेनंतर नवी वस्ती लागली.
पावणेदहा वाजत आले होते.
रस्त्याने चालत असताना एका
सोसायटीतील मय्यांनी आम्हाला बालभोगासाठी
थांबवले. चहा आणि नमकीनचे ओझे
झालेले असल्यामुळे आम्ही
टाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण
त्या महिलांनी आग्रह
केला. थोड्याच वेळात
आणखी चार-पाच
मय्या तिथे आल्या
आणि आम्हाला सोसायटीच्या इमारतीसमोर नेले.
ताटे
वाढून आणली गेली.
चक्क बाजरीच्या भाकरऱ्या आणि भाजी अशी
साग्रसंगीत भोजनप्रसादी पाहून आमची पंचाईत
झाली, पण शेवटी
हळूहळू सर्व संपवावे लागले.
आमचे भोजन आटोपत
आले, तितक्यात तेथे
आणखी परिक्रमावासी आले.
याच
वेळी सत्संगी महाराजांनी "अप्पा..... माऊली..."
असा हंबरडा फोडत एकदम
हातातील ताट खाली ठेवले
आणि समोरच्या व्यक्तीला मिठी
मारली. त्यांच्या या
आरडाओरड्यामुळे
तेथे असलेल्या त्या
मय्या दचकल्या! नवले
महाराजांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, "अहो, असे अचानक
आरडाओरडा करू नका," पण सत्संगी महाराज
ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. याच आवेशात
ते म्हणाले, "मी कोणाचेही ऐकणार
नाही. मला कोणी
सांगायची गरज नाही." यावर नवले
महाराज संतापले, म्हणाले; "मग जा
त्यांच्याबरोबर,
आमच्याबरोबर कशाला येता?" यावर सत्संगी महाराजांचा आवेश
एकदम ओसरला. नंतर
कळले की ती
व्यक्ती आळंदी परिसरातील होती
आणि सत्संगी महाराज
त्यांना ओळखत असावे, पण
त्यांच्या या एकंदर वर्तनामुळे ती
व्यक्तीही भांबावली होती.
कपिलेश्वर,
भजी आणि मोरारीबापूंचा कार्यक्रम
आम्ही
तवरा गावाची हद्द
सोडली. पुढे रस्त्याला दोन
फाटे फुटले होते,
आणि चौकशी करूनही
योग्य मार्ग कळेना.
आम्ही डाव्या बाजूच्या रस्त्याने जायचे
ठरवले, जो नेमका
बायपास ठरला. यामुळे
एका मंदिराचे दर्शन
घेणे राहून गेले
आणि वळसाही पडला.
आम्ही तवरा गावठाणात पोहोचलो आणि
चिंतनाथ महादेव मंदिरात गेलो.
कपिल मुनींनी तपश्चर्या केल्यामुळे याला
कपिलेश्वर महादेव म्हणूनही ओळखले
जाते.
पुढे
तासाभरात कडोद या गावात पोहोचलो. येथे
कोटेश्वर महादेव तीर्थ
आहे. वाटेत परिक्रमावासींसाठी सेवाकेंद्र चालविणाऱ्या बाबाजींनी चहा
पाजतो म्हणत गरमागरम पालक आणि बटाट्याची भजी तळून
आग्रहाने खाऊ घातली.
आम्ही
पुढे शुक्लतीर्थाकडे चालू
लागलो, जिथे शुक्लेश्वर महादेवाचे दर्शन
घेतले. वाटेत जागोजागी मोरारीबापूंच्या कथेचे फलक
लागले होते. मंगलेश्वरजवळ अमेरिकास्थित एका
कुटुंबाने हा भव्य कार्यक्रम आयोजित
केला होता. या
कार्यक्रमामुळे
झालेल्या गर्दीमुळे आणि गोंधळामुळे तिथे
न थांबण्याचे आम्ही
ठरवले.
गर्दी टाळण्यासाठी भारद्वाज आश्रमात मुक्काम
आम्ही
गर्दीपासून दूर राहण्यासाठी थोडं
पुढे गेलो आणि
दत्तमढी येथे
पोहोचलो. तेथे दिसलेल्या भारद्वाज आश्रमाकडे जाण्याचा निर्णय
घेतला, कारण तिथे
गर्दी कमी असेल
असा आमचा अंदाज
होता.
आम्ही
तिथे गेलो तेव्हा
आमच्या आधी फक्त
दोन परिक्रमावासी येऊन
थांबले होते. आम्ही
आणि ते असे
एकूण पाच जण
त्या दिवशी आश्रमात मुक्कामाला होतो.
आश्रम खूप मोठा
आहे. व्यवस्था पाहणारे बाबाजी
उपस्थित होते. आसने लावून
मंदिरांचे दर्शन घेतले. या
वेळीही सत्संगी महाराजांच्या अश्रूपाताचा नेहमीचा प्रयोग
पार पडला.
सायंपूजा झाल्यावर 'भोजन
की सिताराम' झाली.
एका २५-३०
वर्षांच्या तरुण मय्याने अतिशय
झटपट आणि रुचकर भोजनप्रसादी आमच्यासाठी तयार
केली होती.
वास्तविक पाहता,
मंगलेश्वर येथे मोनीबेन आणि ज्योतीबेन यांचा
आश्रम आहे, जे
नर्मदा खंडात प्रसिद्ध आहेत.
त्यांना भेटण्याची इच्छा होती, पण
मोरारीबापूंच्या
कथेमुळे झालेला गोंधळ पाहून
त्यापासून दूर राहण्यासाठी भारद्वाज आश्रमात थांबण्याचा आमचा
निर्णय अतिशय योग्य
ठरला.
दुसऱ्या दिवशी
पहाटे उठून आन्हिके आणि
पूजापाठ आटोपून आम्ही पुढे
निघालो. नवले महाराजांची तब्येत
आता खूपच बरी
होती.
लेबल्स, सर्च डिस्क्रीपशन आणि हॅश टॅग्ज:
Labels: Narmada Parikrama, Bharuch,
Tirthas, selfless service, companion behavior, Kapileshwar Mahadev, Morari Bapu
Katha, ashram stay, pilgrimage challenges, Mithitalai
Search Description: A Marathi
travelogue section describing the Narmada Parikrama from Bharuch, detailing
overwhelming community service, the visit to Kapileshwar Mahadev, a difficult
encounter with Satsangi Maharaj's outburst, and the decision to avoid the large
crowds at Mangleshwar (due to Morari Bapu's Katha) by staying at the peaceful
Bharadwaj Ashram.
Hashtags: #NarmadaParikrama #Bharuch
#Kapileshwar #SevaBhav #SatsangiMaharaj #PilgrimageLife #MorariBapu
#CrowdManagement #AshramLife #NarmadeHar
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html
नर्मदा परिक्रमा करताना....
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html
१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html
१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर: सेवेचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html
१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_23.html
१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_24.html
नर्मदाखंडातील पर्यावरण संवर्धनाचे आव्हान
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_25.html
मांडूचे चतुर्भुज श्रीराम मंदिर: आस्था, इतिहास आणि वास्तुकलेचा अनोखा संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_58.html
नर्मदा परिक्रमा मार्गावरील आश्रमात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सेवा कशी देता येईल?
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_26.html
नर्मदा खंडातल्या शब्दांमधून उलगडणारी 'माई'ची भाषा: नियमांची शिस्त नव्हे, मायेचा संवाद!
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_45.html
१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_28.html
१७ नर्मदा परिक्रमा : विमलेश्वरचा अंतिम टप्पा: माईची कृपा आणि समुद्रपार
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_30.html
१८ नर्मदा परिक्रमा : पितृभूमीकडून देवभूमीकडे
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post.html
१९ नर्मदा परिक्रमा : टीबी गावातील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post_4.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: