१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग

 


१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग

अविधाहून आम्ही सकाळी निघालो. वाटेत 'जगन्नाथ मंदिर' असा एक फलक दिसला. परिक्रमामार्गात आजपर्यंत ठीकठिकाणी महादेवाची, राम, कृष्ण, मारुतीरायाची मंदिरे दिसली होती. जगन्नाथाचे मंदिर पहिल्यांदाच पाहत होतो. सत्संगी महाराजांना जगन्नाथ मंदिर म्हटल्यावर आनंद झाला. ते म्हणाले, 'चला... दर्शन घ्यायचेच.' आम्हीही आत गेलो. मंदिराच्या अलीकडेच आश्रमाची इमारत होती. तेथील बाबाजी भाजी चिरत बसले होते. त्यांना नर्मदे हर केले. परंतु, त्यांनी आमच्या 'नर्मदे हर'ला उत्तर देणे सोडाच, आमच्याकडे पाहून पाहिल्यासारखे केले. मग आम्ही फार विचार करता मंदिरात गेलो. जगन्नाथाचे आणि महादेवाचे दर्शन घेतले. जगन्नाथपुरीतील मूर्तींप्रमाणेच येथील मूर्ती आहेत.

दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे चालू लागलो. सत्संगी महाराजांची कुरकुर चालू झाली होती. 'थांबलो असतो तर काय बिघडले असते? आत्ताच तर निघालोय... अजून बराच वेळ आहे...' त्यांच्या नेहमीच्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करत आम्ही पुढे चालू लागलो. तिथून जगदीशमढी चार किलोमीटरवर आहे. येथील जगदीश बापू नर्मदा खंडात फार प्रसिद्ध आहेत. अतिशय थोर संत अशी त्यांची ख्याती आहे. डोक्याला काठेवाडी मुंडासे आणि त्याच पद्धतीची पैरण धोतर या वेशात त्यांची सतत लगबग सुरू असते. मैयाच्या किनारी असलेला हा आश्रम खूप मोठा आहे. येथे अखंड रामनामाचा जप आणि रामायणाचा पाठ चालू असतो. परिक्रमावासींसाठी आणि भुकेल्यांसाठी अन्नदान सुरू असते.

आम्ही गेलो तेव्हा सुमारे साडेनऊ-दहा वाजत आले होते. साडेदहा वाजता भोजनप्रसादी तयार होईल, तोपर्यंत कुणीही येथून बाहेर जायचे नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. मग आम्ही आमचे ओले कपडे वाळत टाकले. आश्रमातील मंदिरांचे दर्शन घेतले. इथे मैयाच्या पात्रात मगरी असतात असे सांगितले जाते, त्यामुळे 'काळजी घ्या' असे फलक लावलेले होते. बरोबर साडेदहाच्या सुमारास 'भोजन की सीताराम' झाली. आम्ही भोजन केले, जगदीश बापूंना नमस्कार केला आणि पुढे निघालो.

अखेर औषधे मिळाली

मोठा सांजा, राणीपुरा मार्गे उचेडिया येथे पोहोचलो. तेथे रस्त्यालगत चहाप्रसादी सेवा देणाऱ्या कुटुंबाने आम्हाला बोलावले. तिथे चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. तिथून दोन किलोमीटरवर गुमानदेव हे हनुमान मंदिर आणि आश्रम आहे. हे तीर्थ तसे पुरातन आहे, पण आताशा त्याची व्यवस्था नीट राखली जात नसल्याचे जाणवले. मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे चालू लागलो.

तिथे असलेला पूल ओलांडून पलीकडे आलो, तर तिथे एक मोठे दुमजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दिसले. हे हॉस्पिटल बंद पडले आहे, पण तळमजल्यावर असलेल्या एका गाळ्यात एका डॉक्टरांचे क्लिनिक होते, तर दुसऱ्या गाळ्यात एक मेडिकल स्टोअर होते. मेडिकल स्टोअर पाहिल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही तिथे गेलो. मला हव्या असणाऱ्या औषधांची चौकशी केली. दुपारची वेळ होती. मेडिकल स्टोअरचे मालक जेवायला गेले होते. त्यांचा मुलगा मधल्या वेळेत दुकान सांभाळत होता. त्याला कोणती औषधे कुठे ठेवली आहेत याची नेमकी माहिती नव्हती. त्याने आपल्या वडिलांना फोन करून माहिती घेतली. मला हवी असणारी सर्व औषधे तिथे नव्हती, अर्धी औषधे तिथे मिळाली. या औषधांचे सुमारे साडेसहाशे रुपये झाले होते, परंतु मेडिकल स्टोअर मालकांनी आपल्या मुलाला अवघे तीनशे रुपये घेण्याची सूचना फोनवरून केली. त्याने आमच्याकडून तितकेच पैसे घेतले.

यावेळी सत्संगी महाराजांचा हट्ट चालू झाला, 'बाजूच्या डॉक्टरला पाय दाखव आणि उपचार करून घे.' शेवटी त्यांना समजावावे लागले, 'ते डॉक्टर जे उपचार करणार आहेत, तेच आता मी करणार आहे. त्यासाठीच हे औषध घेतले आहे. आता आपण डॉक्टरांकडे गेलो, तर ते ड्रेसिंग करतील आणि औषधे, गोळ्या देतील त्या याच असतील. आणि तेही आपल्याकडून पैसे घेणार नाहीत. त्यामुळे कशाला त्यांना विनाकारण त्रास द्यावा? औषधे तर आपण घेतली आहेत.'

दरम्यान, सत्संगी महाराजांनी आपला पायदुखीचा आजार त्या मुलाला सांगितला. त्याने वेदनाशमन करणारे एक मलम त्यांना दिले. त्या ट्यूबवर १३५ रुपये छापील किंमत होती, पण त्याने त्याचे पैसे घेतले नाहीत. त्याला 'नर्मदे हर' करून आम्ही पुढे निघालो.

गोवाली येथील गोपेश्वर तीर्थ, मांडवा मार्गे नवागाम येथील रोकडिया हनुमान मंदिरात जाऊन आसन लावले. आजूबाजूचे गावकरी या मंदिरातील आश्रमाची व्यवस्था पाहतात. खूप तरुण मुले मोठ्या उत्साहाने या कामात सहभागी होत होती. हा आश्रम मंदिरासमोरून जाणाऱ्या एका छोट्या रस्त्याच्या पलीकडे आहे.

परिक्रमा मार्गावरील 'सत्संगी जुगलबंदी'

या आश्रमात आम्ही पोहोचलो तेव्हा फार कुणी नव्हते. आमच्या आधी दोघे जण तिथे थांबले होते. त्यापैकी एक परिक्रमावासी बहुधा उत्तर प्रदेशातील होते आणि त्यांनी आपल्याबरोबर असलेल्या दंडाला चक्क एक मोठा कोयता बांधून ठेवला होता. त्रिशूल वगैरे पाहिले होते, पण कोयता म्हणजे जरा अतिच झाले. त्यांच्या शेजारी सत्संगी महाराजांना आसन लावायला जागा मिळाली. आलेल्या माणसाशी बोलणे सुरू करायचे, त्यानंतर त्याला परिक्रमेतले काहीच कसे समजत नाही, तो कसा बुद्धू आहे हे दाखवून द्यायचे आणि परिक्रमेची इत्थंभूत माहिती आणि ज्ञान आपल्याला कसे आहे हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायचा, असा त्यांचा उद्योग सुरू होता. सत्संगी महाराजांना त्यांच्या शेजारी आसन लावावे लागले. त्यामुळे आता या दोघांची जुगलबंदी कशी होणार याकडे माझे लक्ष होते.

त्या परिक्रमावासीने सत्संगी महाराजांना 'कुठून आलात? काय पाहिले?' वगैरे चौकशी केली आणि नंतर त्यांच्या चुका काढण्यास सुरुवात केली. मला हा सगळा प्रकार पाहून हसू काही आवरेना, म्हणून मी तिथून उठून बाजूला निघून गेलो. नवले महाराजही आधीच बाहेर गेलेले होते. तेवढ्यात तिथे महाराष्ट्रातीलच पंधरा-वीस जणांचा मोठा जत्था आला आणि मग आश्रम भरून गेला.

संध्याकाळ होत आली होती. आम्ही सायंपूजा केली. तोपर्यंत गावकऱ्यांची भोजनासाठी लगबग सुरू झाली होती. गावातील काही महिला येऊन स्वयंपाक करत होत्या, मुले त्यांना मदत करत होती. थोड्या वेळाने 'भोजन की सीताराम' झाली. मंदिराच्या प्रांगणात परिक्रमावासींच्या पंगती बसल्या. गावकरी अगदी आग्रह करकरून वाढत होते. एकूणच, गावकऱ्यांची या मंदिराबद्दल असलेली श्रद्धा आणि एकी सगळीकडे दिसून येत होती. आश्रमाचा बराचसा भाग उघडा असल्यामुळे गार वारा येत होता. डोक्यावरून पांघरूण घेऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करता करता कधी डोळा लागला ते कळलेही नाही.

 

Labels: Marathi literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, divine grace, human nature, community service, physical healing, selfless acts, pilgrimage

Search Description: A Marathi spiritual travelogue recounting the journey from Avida. The author describes the grandeur of Jagdish Bapu's ashram and the transformative power of kindness at a medical store, where he finally receives medicine for his septic foot at a heavily discounted price. The narrative also includes a humorous encounter with a fellow pilgrim, highlighting the diverse characters on the path.

Hashtags: #NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineGrace #ActsOfKindness #Pilgrimage #HumanNature #HealingJourney #NarmadaSeva #JagdishBapu

-------------------------------

नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html

७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html

मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html

८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html

९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html

१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html

११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html

नर्मदा परिक्रमा करताना....

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html

१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html

१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर: सेवेचे विविध रंग

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html

१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_23.html

----------------------------------

नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी 

मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.

मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.

जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?

या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.

·         तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.

·         तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.

हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...

·         तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.

·         तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.

·         तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.

·         तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.

या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

 


१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग १५ नर्मदा परिक्रमा :  अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग Reviewed by ANN news network on ९/२४/२०२५ ०५:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".