१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे

 


१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे

नवागाममधील त्या आश्रमात पहाटे तीन-साडेतीनलाच जाग आली. महाराष्ट्रातील परिक्रमावासींचा जत्था उठून आंघोळी उरकण्याच्या मागे होता. चार संडास आणि चार बाथरूम अशी सोय होती, पण आंघोळीसाठी गर्दी झाली. त्यातच काही महिला अन्य परिक्रमावासींचा विचार करता बाथरूममध्ये कपडे धूत बसल्या होत्या. कडाक्याची थंडी, धुकं आणि वाट पाहणे हा प्रकार थोडा कंटाळवाणा होता. थोड्या वेळाने माझा नंबर लागला, आंघोळ केली आणि बाहेर पडून मी मैय्याची प्रात:पूजा सुरू केली. नवले महाराजांनीही आपली पूजा आटोपली. सत्संगी महाराज आंघोळ करून आले आणि त्यांची पूजा त्यांनी आटोपली.

सकाळी चहाप्रसादी घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. सामोर, अंदाडा, झरकुंड या मार्गे आम्ही दुपारी बाराच्या सुमारास रामकुंडापर्यंत पोहोचलो. हे स्थळ अंकलेश्वर या मोठ्या शहराजवळ आहे. श्रीरामाने बाण मारून तयार केलेले हे कुंड आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर मागील आश्रमात आंघोळीनंतर पिळलेले कपडे वाळत टाकले आणि येथील मंदिरांचे दर्शन घेतले.

क्षिप्रा गणपती मंदिर आणि रामकुंडाचे महत्त्व

येथे क्षिप्रा गणेश म्हणून एक गणपतीचे देवालय आहे, ज्याचा नुकताच जीर्णोद्धार झाला आहे. एका फलकावर गुजराथीत या स्थानाचे महत्त्व सांगितले आहे. ते असे...

क्षिप्रा गणपती मंदिर (गौतम गणेश) इतिहास:

मांडव्य ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेले हे पवित्र रामकुंड आहे, ज्याचा उल्लेख नर्मदा पुराण आणि श्रीमद्भगवद्गीतेत आहे. शेकडो वर्षांपासून मांडव्येश्वर मंदिरासह गौतम गणेश म्हणून स्थापित झालेले हे ऐतिहासिक मंदिर कालांतराने खराब झाले होते. गौतम गोत्राच्या वंशजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन क्षिप्रा गणपतीची मूर्ती स्थापित करण्याचा निर्णय घेतला.

क्षिपा गणेशाबद्दल:

'क्षिप्रा'चा अर्थ आहे - भक्तांना त्वरित शुभ फळ देणारी. क्षिप्रा गणपतीची ही मूर्ती श्री विघ्नहर गणेशाच्या ३२ मुद्रांपैकी एक आहे. ही देवता दिसायला सुंदर आहे, त्वरित आशीर्वाद आणि फळे देते. ती हातात पाश, लगाम आणि इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष धारण करते, आणि उजव्या हातात अलंकार रत्नांनी भरलेले भांडे धारण करते. हे भारतातील क्षिप्रा गणेशाचे नववे आणि गुजरातमधील पहिले मंदिर आहे. प्रत्येक अंगारकी चतुर्थीला येथे गणेशयागाचे आयोजन केले जाते.

रामकुंडातील पाण्यावर शेवाळ धरले होते, गुजरात शासनाने बांधलेल्या हॉलमध्ये आम्ही थोडावेळ बसलो. थोड्याच वेळात भोजनप्रसादी झाली आणि आम्ही भोजन घेतले. वाळत आलेले कपडे काढून घेतले आणि आश्रमाच्या महंतांना नर्मदे हर करून पुढे चालू लागलो.

अंकलेश्वर शहरातून बुलबुलाकुंडाकडे

आज आम्हाला बुलबुलाकुंडापर्यंत जायचे होते. हा टप्पा अंकलेश्वर या मोठ्या शहरातून जाणारा आणि सुमारे अकरा किलोमीटरचा होता. या टप्प्यात सत्संगी महाराजांनी नेहमीप्रमाणे कुरकुर करण्यास सुरुवात केली. आताशा मला त्यांच्या कुरकुरीचा कंटाळा येऊ लागला होता. एक तर ते नवले महाराजांशी काही बोलत नसत, जी काही कुरकुर करायची ती माझ्याशीच करत. सकाळपासून त्यांचे रडगाणे सुरू झाले की एक नकारात्मक भावना मनात तयार होई. त्याचा पुढच्या वाटचालीवर परिणाम होत असे. याचे काय करायचे असा विचार मी करत होतो. पण; काही मार्ग दिसत नव्हता.

अंकलेश्वर शहरातून बाहेर पडून आम्ही बुलबुलाकुंडाकडे निघालो. हे कुंड प्राचीन असून, येथे कश्यप मुनींनी तपश्चर्या केल्याचे दाखले पुराणात मिळतात. येथे कश्यप मुनी आश्रम आहे, ज्याचे पिठाधीश महामंडलेश्वर राजराजेश्वर गिरी आहेत.

'यामाहा बाबा'

बुलबुलाकुंडाजवळ उभे राहून 'नर्मदे हर' असं मोठ्याने म्हटले की कुंडाच्या पाण्यातून बुडबुडे उसळतात, हा चमत्कार येथे आहे. कुंडाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे आणि गुजरात सरकारने परिक्रमावासींसाठी मोठा हॉल बांधून दिला आहे. परिक्रमावासींनी नीट वापरल्यामुळे स्वच्छतागृहांची अवस्था मात्र बिकट होती.

आम्ही तिथे आसने लावली. सत्संगी महाराजांच्या पलीकडे एका बाबाजींचे आसन होते. त्या बाबांकडे कफनीसारखा मोठा गुलाबी झगा होता. ते डोक्यावरून ओढून घेऊन उभे राहून जप करत आणि मध्येच 'ओम... ओम... ओम...' असा मोठ्याने घोष करत. त्यांचा तो घोष मला जुन्या यामाहा आर एक्स हंड्रेड या मोटरसायकलच्या रेस केल्यावर येणाऱ्या आवाजासारखा वाटे, त्यामुळे मी त्यांना मनातल्या मनात "यामाहा बाबा" असे नाव दिले होते.

आसने लावल्यानंतर सायंपूजा सुरू केली. मी श्रीसुक्ताचा पाठ करत होतो. तो बहुधा या बाबांजींना आवडला नसावा. ते सत्संगी महाराजांवर, "मोबाईल कोणी चालू केला आहे?" असे खेकसले. सत्संगी महाराजांनी माझ्याकडे निर्देश करत "मोबाईल नाही, हा म्हणतोय," असे सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिले, मात्र काही बोलता गप्प बसले.

पूजा आटोपल्यावर आम्ही पुन्हा बुलबुलाकुंडाकडे गेलो. तितक्यात पुण्यातील परिक्रमावासींची एक बस आली. या परिक्रमावासींमध्ये एक माईजी नवले महाराजांच्या परिचयाच्या होत्या. नवले महाराजांना बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांची ही चौथी परिक्रमा आहे हे ऐकल्यावर त्यांनी आणि अन्य लोकांनी नवले महाराजांच्या पायावर लोटांगण घालण्यासाठी गर्दी केली.  त्यांनी आम्हाला तिघांना प्रत्येकी शंभर रुपये दक्षिणा दिली. ही दक्षिणा माझ्यासाठी फ़ार महत्वाची होती. का?, ते पुढे सांगेनच... सत्संगी महाराजांनी आवर्जून शेजारच्या यामाहा बाबांनाही शंभर रुपये देण्यास सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांनाही दक्षिणा दिली.

प्रवचन आणि पितृपक्षातील विधी

अजून भोजनप्रसादी होण्यास वेळ होता. मी झाडाखाली बसून राहिलो. इतक्यात तिथे आणखी तीन बसेस आल्या. त्यातून मुंबई-पुण्यातील परिक्रमावासी उतरले. महंतांनी त्यांना प्रवचन दिले. परिक्रमा का आणि कशी करायची यावर ते बोलले. त्यानंतर पितृपक्षामध्ये या ठिकाणी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीबद्दल त्यांनी माहिती दिली आणि परिक्रमावासींनी अकराशे रुपये दक्षिणा देऊन हा विधी आपल्या पूर्वजांसाठी करून घ्यावा असे आवाहन केले. ३५-४० लोकांनी यासाठी नावे नोंदवली.

भोजन झाल्यावर भंडारीबाबांनी अतिशय श्रद्धेने आणि प्रेमाने आम्हाला भोजनप्रसाद दिला. थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता आणि धुकेही पडू लागले होते. रात्री हॉलच्या छपरावर दवबिंदू गळू लागले आणि पागोळ्या गळायला सुरुवात झाली. पहाटे जाग आल्यानंतर स्नान वगैरे आटोपले, पूजा केली आणि नर्मदे हर करून आम्ही पुढे चालू लागलो.

या टप्प्यात आलेल्या अनुभवांमध्ये 'यामाहा बाबां'ची उपस्थिती आणि दक्षिणा मिळणे हे विशेष होते.

 

Labels: Narmada Parikrama, spiritual journey, ashram life, human behavior, funny pilgrimage moments, Ankleshwar, temple donation, personal conflict, travelogue in Marathi

Search Description: Metadata for the Marathi travelogue section from Nawagam to Bulbulakund. It captures the struggle with personal conflict, the humorous encounter with the chanting "Yamaha Baba," the spiritual importance of Ramkund, and the social and financial dynamics of modern ashram hospitality near Ankleshwar.

Hashtags: #NarmadaParikrama #SpiritualJourney #AshramLife #YamahaBaba #PersonalConflict #Ramkund #Bulbulakund #PilgrimageLife #NarmadeHar #Ankleshwar

-------------------------------

नर्मदा परिक्रमानिसर्गसाहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

 नर्मदा परिक्रमा : नर्मदे हरएक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

 नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

 नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

 नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरपरिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

 नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html

 नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडेएक आनंददायी अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html

मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिरएक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html

 नर्मदा परिक्रमा : खलघाटसेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html

 नर्मदा परिक्रमा : शूलपाणीएक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html

१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवसत्याग आणि सेवेचा खरा अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html

११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वरधडगावातील अनोखा अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html

नर्मदा परिक्रमा करताना....

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html

१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html

१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर: सेवेचे विविध रंग

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html

१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_23.html

१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम : मानवी स्वभावाचे विविध रंग

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_24.html

नर्मदाखंडातील पर्यावरण संवर्धनाचे आव्हान

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_25.html

मांडूचे चतुर्भुज श्रीराम मंदिर: आस्था, इतिहास आणि वास्तुकलेचा अनोखा संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_58.html

नर्मदा परिक्रमा मार्गावरील आश्रमात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सेवा कशी देता येईल?

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_26.html

नर्मदा खंडातल्या शब्दांमधून उलगडणारी 'माई'ची भाषा: नियमांची शिस्त नव्हे, मायेचा संवाद!

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_45.html

----------------------------------

नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी 

मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.

मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.

जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?

या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.

·         तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.

·         तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.

हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...

·         तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.

·         तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.

·         तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.

·         तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.

या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

 

 

 

१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे १६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड: कुरकुर आणि बुडबुडे Reviewed by ANN news network on ९/२८/२०२५ ०७:२२:०० PM Rating: 5

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".