नर्मदा परिक्रमा २१ :भारत्द्वाज आश्रम ते मोटी कोरल
०४ जानेवारी रोजी पहाटेच जाग आली. रात्री
उशिरा आश्रमात मोरारीबापूंच्या कथेसाठी आलेले काही प्रवासी बसमधून उतरले होते, त्यांच्या
लगबगीमुळे जाग आली. आंघोळीसाठी थोडावेळ वाट पाहावी लागली. आन्हिके आटोपल्यावर आम्ही
भारद्वाज आश्रमातून बाहेर पडलो आणि पुढे चालू लागलो.
मार्गावर निकोरा (वराह भगवान तीर्थ),
अंगारेश्वर तीर्थ आणि धर्मशाला (धर्मेश्वर महादेव तीर्थ) ही गावे
लागली. तिथून आम्ही झणोर (बलकेश्वर महादेव) येथे गेलो. दुपारच्या सुमारास आम्ही भरूच जिल्ह्यातले शेवटचे गाव असलेल्या नांद येथे पोहोचलो. इथे नंदीकेश्वर
महादेव आणि नंदामाता तीर्थ आहे.
नांद गावातून पुढे वस्ती विरळ होत गेली.
जुना कबीर आश्रमही मागे पडला आणि समोर 'योगानंद आश्रम'चा बोर्ड दिसला. हा आश्रम म्हणजे
एक छोटासा टुमदार बंगला होता. आम्ही गेटमधून आत गेलो. तिथे स्वामी समर्थ, गजानन महाराज,
साईबाबा, शंकर महाराज, अशा संतांची आणि पंचमुखी हनुमान, भगवान दत्तात्रेय यांची छोटी
मंदिरे होती. आणि बाजूला अखंड धुनी चालू होती.
आम्ही दर्शन घेतल्यानंतर संन्यास दीक्षा
घेतलेल्या एका माताजी बाहेर आल्या. आम्ही महाराष्ट्रातले म्हटल्यावर त्यांनी
आमच्याशी छानपैकी मराठीत गप्पा मारायला सुरुवात केली. मी सहज विचारले, "आपण मराठी
खूप छान बोलता, महाराष्ट्रातल्या आहात का?" तेव्हा त्या म्हणाल्या, "हो...
अरे दादा, मी मुंबईची आहे!"
त्या पुढे म्हणाल्या, "काही वर्षांपूर्वी
मी आणि माझ्या मैत्रिणीने परिक्रमा केली. याच गावात आलो तेव्हा दुपार होऊन गेली होती
आणि आम्हाला कोणी प्यायला पाणी देईना. प्रत्येक जण 'आगे जाओ' म्हणत होता. त्याच दिवशी
मी ठरवले की, या ठिकाणी काहीतरी सेवा सुरू करेन." परिक्रमा पूर्ण करून घरी गेल्यावरही
त्यांचे मन रमले नाही. त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि सहा महिन्यांत इथे हा आश्रम
उभा केला.
एखादा माणूस परिक्रमा केल्यानंतर इतका
बदलू शकतो की त्याला आपला कुटुंब-संसारही नकोसा होतो ? असा प्रश्न माझ्या मनात उभा
राहिला.
सेवा, परान्न आणि मराठी परिक्रमावासी
माताजी पुन्हा आमच्याबरोबर गप्पा मारायला
येऊन बसल्या. त्यांनी आम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या: "परिक्रमा
मार्गावर तुम्ही जे परान्न घेता, त्यामुळे तुमचे पुण्य कमी होते आणि ते अन्नदान
करणाऱ्या व्यक्तीला लाभते, हे कायम लक्षात असू द्या. परिक्रमा वारंवार करण्याची गरज
नाही, एकदाच करा पण ती व्यवस्थित करा." त्या म्हणाल्या.
त्यांनी मराठी परिक्रमावासींबद्दलचा
एक अनुभव सांगितला: "आता तुम्ही पाहिलं असेल, इथून पुढे जंगल सुरू होते आणि इथे
बिबट्याचा वावर आहे. एकदा पहाटे परिक्रमावासी समोरील रस्त्याने जात होते. मी त्यांना
हाक मारली आणि चहा घेऊन उजाडल्यावर पुढे निघा, असे सांगितले. त्यावर त्या परिक्रमावासींपैकी
एकाने 'तुम्ही आम्हाला शिकवू नका; आम्हाला जाऊ दे!' असे म्हटले. ही आपल्या महाराष्ट्रातील
माणसे!" त्यांच्या या बोलण्यातून परिक्रमामार्गात मराठी परिक्रमावासी नियमांचे
पालन करत नाहीत, हा जो आक्षेप घेतला जातो, त्याचेच दुःख जाणवले.
बोलता बोलता त्यांनी आम्हाला आलेले अनुभव
विचारले. त्यावेळेस परिक्रमेच्या सुरुवातीस आम्हाला पाणी पाजणाऱ्या मय्येची आठवण झाली
आणि तिच्या आठवणीने आमचे डोळे किंचित ओलावले.
भोजनप्रसादी तयार झाल्यावर माताजींनी आम्हाला
बंगल्याच्या मागील बाजूस बोलावले. तिथे महाराष्ट्रीयन पद्धतीचे भोजन वाढण्यात आले.
त्यांनी प्रत्येकाला डाळीची आमटी भरपूर दिली. त्या म्हणाल्या, "चालताना
या परिक्रमा मार्गावर तुमचं खूप कुपोषण होतं. फक्त कार्बोहायड्रेट मिळतात, प्रोटीन्स
मिळत नाहीत. म्हणून ही आमटी जास्त केली आहे. सूपसारखी प्या; त्यामुळे तुमच्या शरीरात
प्रोटीन जाईल." एवढा सूक्ष्म विचार करणाऱ्या या माताजी बहुधा नर्मदा परिक्रमा
मार्गावर पहिल्याच असाव्यात. त्यांनी आग्रह करून आम्हाला पोटभर खाऊ घातले आणि ऊन्ह
वाढल्यामुळे दीड तास आराम करून मगच पुढे जाण्यास सांगितले.
आम्ही तसेच केले. दीड तासाने माताजींना
नर्मदे हर करून त्यांचा निरोप घेतला आणि पुढे चालू लागलो. तिथून सोमज, देलवाडा मार्गे
संध्याकाळ होता होता आम्ही मोठी कोरल येथे पोहोचलो.
मोटी कोरल: पंचकुबेर क्षेत्रात मुक्काम
मोठी कोरल हे परिक्रमा मार्गातील अतिपवित्र
स्थळ मानले जाते. येथे पंचकुबेर क्षेत्र, आदिवराह तीर्थ आणि कोटीतीर्थ अशी महत्त्वाची
तीर्थे आहेत. आम्ही पुनीत आश्रमात पोहोचलो, आसन लावले आणि सायंपूजा आटोपली.
आम्हाला आसने लावण्यासाठी पहिल्या मजल्यावर जागा मिळाली होती, तिथे चांगलाच गारवा होता. भोजनप्रसादी घेऊन आम्ही लवकरच निद्राधीन झालो. पहाटे लवकर जाग आली. आंघोळ आटोपून रुद्रपाठ केला. चायप्रसादी घेऊन आश्रमाच्या व्यवस्थापकांना नर्मदे हर करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो.
Labels: Narmada Parikrama, Mumbai Mataji, Yogananad Ashram, Narmada Service, Protein Diet, Koral, Panchkuber Kshetra, Pilgrimage Rules, Spiritual Transformation, Bharuch to Koral
Search Description: A Marathi
travelogue section describing the Narmada Parikrama from Bharuch to Korle. Key
events include the meeting with a Mumbai-based, Sannyasin Mataji at Yogananad
Ashram in Nand who provides thoughtful service (including protein-rich food),
the discussion on the discipline of Marathi pilgrims, and the eventual night
halt at the holy Panchkuber Kshetra in Korle.
Hashtags: #NarmadaParikrama
#MumbaiMataji #YogananadAshram #ProteinSeva #Korle #Panchkuber #NarmadaService
#PilgrimageRules #Sanyasi #NarmadeHar
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html
नर्मदा परिक्रमा करताना....
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html
१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते
तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html
१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर:
सेवेचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html
१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा:
सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_23.html
१५ नर्मदा परिक्रमा : अविधा ते नवागाम
: मानवी स्वभावाचे विविध रंग
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_24.html
नर्मदाखंडातील पर्यावरण संवर्धनाचे आव्हान
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_25.html
मांडूचे चतुर्भुज श्रीराम मंदिर: आस्था,
इतिहास आणि वास्तुकलेचा अनोखा संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_58.html
नर्मदा परिक्रमा मार्गावरील आश्रमात बाहेरून
येणाऱ्या व्यक्तीला सेवा कशी देता येईल?
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_26.html
नर्मदा खंडातल्या शब्दांमधून उलगडणारी
'माई'ची भाषा: नियमांची शिस्त नव्हे, मायेचा संवाद!
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_45.html
१६ नर्मदा परिक्रमा : रामकुंड ते बुलबुलाकुंड:
कुरकुर आणि बुडबुडे
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_28.html
१७ नर्मदा परिक्रमा : विमलेश्वरचा अंतिम
टप्पा: माईची कृपा आणि समुद्रपार
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_30.html
१८ नर्मदा परिक्रमा : पितृभूमीकडून देवभूमीकडे
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post.html
१९ नर्मदा परिक्रमा : टीबी गावातील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post_4.html
२० नर्मदा परिक्रमा : भरूच ते दत्तमढी,
भारद्वाज आश्रम: जिव्हाळा, गोंधळ आणि नवीन वर्षाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/10/blog-post_8.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi
----------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: