समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड

 

उरण, दि. ९ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी (Raigad District President, NCP Youth Congress) निवड करण्यात आली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष  शेख यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.

उरण तालुक्यातील गोवठणे गावचे सुपुत्र असलेले समाधान म्हात्रे हे सुरुवातीपासूनच पक्षाचे कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. याआधी ते महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस कै. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात समाधान म्हात्रे हे नेहमी सहभागी होत असून, पक्षाची ध्येयधोरणे, कार्य आणि विचार तळागाळात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे केले आहे. ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. समाधान म्हात्रे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल समाधान म्हात्रे यांनी सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.


समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड Reviewed by ANN news network on ७/०९/२०२५ ०५:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".