नागरिकांना त्रास झाल्याने भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंकडून पाहणी व आढावा
पिंपळे सौदागर, ९ जुलै (प्रतिनिधी): पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर सुरू असलेल्या १२ मीटर व १८ मीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची पाहणी आज बुधवार, दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली. कामाचा वेग वाढवून सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभाग अधिकाऱ्यांना केली.
गेली अनेक दिवसांपासून कुणाल आयकॉन रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्याचे काम प्रकल्प विभागामार्फत सुरू आहे. मात्र, कामात येणाऱ्या विविध अडचणींमुळे रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा वेग मंदावला आहे. यामुळे कुणाल आयकॉन रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, नागरिक हैराण झाले आहेत.
या गंभीर समस्येची दखल घेत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आज स्वतः या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि कामाचा सविस्तर आढावा घेतला. पाहणी दरम्यान, त्यांनी संबंधित विभागाला रस्त्याच्या कामाचा वेग वाढवून ते तातडीने पूर्ण करावे, तसेच लवकरात लवकर सदर रस्ता नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर, ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे झाले आहेत, अश्या ठिकाणी पावसामुळे पाणी भरल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तातडीने खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचेही आदेश त्यांनी दिले.
या पाहणीवेळी प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता सुनील पवार, कनिष्ठ अभियंता केतकी कुलकर्णी, टी अँड टी इन्फ्रा लिमिटेडचे कॉर्डिनेटर भीमाशंकर भोसले, इन्फ्राकिंग कन्सल्टंट लीडर पतंगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
७/०९/२०२५ ०५:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: