मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील घटना
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशिगाव पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पोलीस उपनिरीक्षक भगवान मोहन पालवे (वय ४२) यांना १५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
१८ ऑगस्ट २०२५ रोजी एसीबीच्या ठाणे पथकाने काशिगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीतच सापळा रचला. सायंकाळी ६:४५ वाजता पालवे यांना तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ACB Trap
Police Corruption
Bribery
Maharashtra Police
Kashigaon Police
#ACBTrap #PoliceCorruption #MaharashtraPolice #Bribery #KashigaonPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: