समस्येवर राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्व राज्यांना निर्देश
रेबिज झालेल्या कुत्र्यांना आश्रयागृहात ठेवण्याचे आदेश; सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित
सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई; खास जागा तयार करण्याचे निर्देश
नवी दिल्ली, (प्रतिनिधी): रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण आणि लसीकरण केल्यानंतर त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडून द्यावं, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, रेबिजची लागण झालेल्या किंवा आक्रमक वर्तन करणाऱ्या कुत्र्यांना सोडून न देता त्यांना श्वान आसरा केंद्रात ठेवण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
भटक्या कुत्र्यांना सरसकट श्वान आसरा केंद्रात पाठवण्याच्या दोन सदस्यीय खंडपीठाच्या आधीच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढवत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार म्हणून घोषित केले आहे. तसेच, या समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याबाबत त्यांचे उत्तर मागण्यासाठी सर्व राज्यांच्या पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे.
या व्यतिरिक्त, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांची माहिती मागवून ती सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यांच्यासाठी खास जागा तयार करावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
Supreme Court
Stray Dogs
Sterilization
National Policy
Animal Welfare
#SupremeCourt #StrayDogs #AnimalWelfare #NationalPolicy #India

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: