भारती विद्यापीठ पोलिसांची विशेष कामगिरी
गुप्त माहितीच्या आधारे १९ वर्षीय आरोपी जेरबंद
पुणे: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक केली आहे. करण भारत गजरमल (वय १९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होता.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पाहिजे असलेला आरोपी करण गजरमल हा गदा चौकाजवळ थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने, ज्यात पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे यांचा समावेश होता, त्या ठिकाणी सापळा रचला. या पथकाने आरोपीला १९ ऑगस्ट २०२५ रोजी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
ही कामगिरी अपरआयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त मिलींद मोहीते, आणि सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे.
Pune Police
Crime
Arrest
Attempted Murder
Fugitive
#PunePolice #Crime #Arrest #AttemptedMurder #Fugitive #BharatiVidyapeethPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: