अर्बन नक्षलवादाचे खरे जनक काँग्रेसच आहे - भाजप नेते माधव भांडारी
‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’तर्फे टिळक स्मारक मंदिर येथे विशेष परिसंवाद
हिंदूंनी संघटित होऊन कृतीशील पावले उचलण्याची गरज - सुनील घनवट
पुणे, (प्रतिनिधी): अर्बन नक्षलवादाच्या समस्येचे खरे जनक काँग्रेसच आहेत, असे ठाम प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे. टिळक स्मारक मंदिर येथे ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने ‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ या विषयावर आयोजित विशेष परिसंवादात ते बोलत होते.
माधव भांडारी म्हणाले की, १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात साम्यवाद्यांनी इंग्रजांना मदत केली होती, याची नोंद इतिहासात आहे. पंडित नेहरूंनी अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान दिला. बंगालमधील नक्षलवाद असो वा पंजाबमधील खलिस्तानी समस्या, काँग्रेसने त्यावर कधीही प्रामाणिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट म्हणाले की, अर्बन नक्षलवादाविरोधात लढण्यासाठी हिंदूंनी स्वतःची ‘इकोसिस्टम’ उभी केली पाहिजे. तर, लेखक अभिजित जोग यांनी, समाजात अराजक निर्माण करणे हे साम्यवाद्यांचे प्रमुख शस्त्र असल्याचे सांगितले. तसेच, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी, व्यवस्थेची मानसिकता बदलल्याशिवाय नवीन कायद्यांचा उपयोग मर्यादित राहील, असे मत व्यक्त केले. लेखक विक्रम भावे यांनी तुरुंगातील अनुभवावर बोलताना सांगितले की, शहरी नक्षलवादी कैद्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी विष पेरत होते.
या परिसंवादाला प्रचंड पावसाची तमा न बाळगता पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Urban Naxalism
Pune Seminar
Madhav Bhandari
Rashtrabhakt Adhivakta Samiti
BJP
#UrbanNaxalism #Pune #MadhavBhandari #BJP #Seminar #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: