संजय राऊत यांनी सोनिया गांधींना 'मॅडम' म्हणून बाळासाहेब ठाकरेंना खोटे पाडले - नवनाथ बन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका करणे योग्य नाही
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुंबई खड्ड्यात गेली - नवनाथ बन
मुंबई, (प्रतिनिधी): बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील निकालाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) अनंत चतुर्दशीपूर्वीच विसर्जन सुरू झाले असून, आगामी मुंबई महापालिकेत या गटाचे पूर्णपणे विसर्जन होणार आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली. प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत यांनी 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या सोनिया गांधींचा उल्लेख 'मॅडम सोनिया गांधी' असा करून बाळासाहेब ठाकरेंना खोटे पाडले, असा प्रहारही नवनाथ बन यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंनी ‘सामना’मध्ये सोनिया गांधींना ‘करप्शन क्वीन’ म्हटले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
यावेळी नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे संजय राऊत यांना चांगलीच 'मिरची झोंबली' आहे. राज्याच्या विकासाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी होणे स्वाभाविक आहे, त्यामुळे लगेच राजकीय अर्थ काढू नये, असे त्यांनी सांगितले.
अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई खड्ड्यात गेली, पण त्याच काळात देवेंद्र फडणवीस लोकांच्या प्रश्नांसाठी वेळ देत होते. त्यांनी विकासकामांचा श्रीगणेशा केला आहे, असे सांगत बन यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकांचा उत्तम पाठिंबा मिळत असल्याचे नमूद केले.
Sanjay Raut
Navnath Ban
BJP
Shiv Sena (UBT)
Political Commentary
#SanjayRaut #NavnathBan #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #UddhavThackeray

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: