महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'विचार प्रबोधन पर्व' आयोजित करा - आपची मागणी
गांधीजींचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक - आप शहराध्यक्ष रविराज काळे
पिंपरी चिंचवड महापालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी चिंचवड, (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, २ ऑक्टोबर २०२५ रोजी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी (आप) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी केली आहे.
महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे, असे काळे यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त (जनसंपर्क विभाग) आणि जनसंपर्क अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी कार्यक्रमाचे स्वरूप, स्थळ, वेळापत्रक, मान्यवर अतिथी आणि जनजागृतीसाठी नियोजन बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिक, विशेषतः तरुण पिढी, गांधीजींच्या विचारांशी जोडली जाईल आणि सत्य, अहिंसा व राष्ट्रसेवेचे मूल्य समाजात रुजतील, असा विश्वास रविराज काळे यांनी व्यक्त केला आहे.
Mahatma Gandhi
Gandhi Jayanti
Pimpri-Chinchwad
AAP
Raviraj Kale
#GandhiJayanti #MahatmaGandhi #PimpriChinchwad #AAP #VicharPrabodhanParva

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: