वाघोली पोलिसांनी तात्काळ घेतली दखल; जबाबदार बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची तयारी
पुणे/वाघोली, (प्रतिनिधी): वाघोली-बकोरी रोडच्या पावसामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे येथील नागरिक आक्रमक झाले असून, रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी रविवारी त्यांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या १३ वर्षांपासून हा रस्ता खराब असून, खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्याची दुर्दशा झाल्याने नागरिक गंभीर जखमी होत आहेत, तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याप्रकरणी न्यायालयीन कार्यवाही सुरू असली तरी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि वाहतूक सुरळीत केली. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, पोलिसांनी त्यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
जर हा प्रश्न लवकर सुटला नाही, तर काही दिवसांत आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे.
Pune
Wagholi
Road Protest
Infrastructure
Public Grievance
#Pune #Wagholi #RoadProtest #Infrastructure #PublicGrievance #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: