माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वासपुणे, (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील भोर आणि मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेशावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. हे सर्व प्रवेश माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यात विकासाचे पर्व सुरू आहे. 'सबका साथ सबका विकास' या मंत्राप्रमाणे सर्वदूर विकासात्मक कामे गतीने सुरू आहेत." त्यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच या परिसरातील अनेक वर्षांचा विकासात्मक अनुशेष भरून काढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
Pune Politics
BJP
Ravindra Chavan
Sangram Thopte
Party Entry
#Pune #BJP #RavindraChavan #SangramThopte #MaharashtraPolitics #PartyEntry

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: