नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग, दिंडोरी येथील उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नाशिक पथकाने दोन लाख १६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तक्रारदार हे
सरकारी बांधकाम कंत्राटदार आहेत.
त्यांच्या कामाच्या अंतिम
बिलांसाठी उप अभियंता योगेश
नारायण घारे आणि
कनिष्ठ अभियंता मनिष
कमलाकर जाधव यांनी
२ लाख १६
हजार रुपयांची लाच
मागितली होती. तक्रारदाराने याबाबत
एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दिंडोरी येथे
सापळा रचला. या सापळ्यात उप
अभियंता योगेश नारायण घारे
(वय ४४) आणि
कनिष्ठ अभियंता मनिष
कमलाकर जाधव (वय
२९) यांना २
लाख १६ हजार
रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
या दोन्ही
आरोपींविरुद्ध
दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम
७, १२ नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. एसीबीच्या या
कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर वचक
बसण्यास मदत होईल अशी
अपेक्षा व्यक्त केली जात
आहे.
Corruption, Nashik, ACB, Bribery, Arrest, Zilla Parishad,
Dindori
#Nashik #ACB #Bribery #Corruption #Arrest #ZillaParishad #DindoriPolice #MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: