संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
विद्यार्थ्यांकडून भारतातील समृद्ध सांस्कृतिक वैविध्य सादर केले जाणार
पुणे, (प्रतिनिधी): महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस, पुणे कॅम्पस) येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी'चे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले असून, सकाळी ८.३० वाजता आझम कॅम्पस फंक्शन ग्राउंड येथे संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
ध्वजारोहणानंतर विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी भारतातील समृद्ध सांस्कृतिक वैविध्य दर्शवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
Azam Campus
Independence Day
Flag Hoisting
Cultural Program
Abeda Inamdar
#AzamCampus #Pune #IndependenceDay #FlagHoisting #CulturalEvent #AbedaInamdar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: