ठाणे गुन्हे शाखेची भिवंडीत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
ठाणे (प्रतिनिधी): ठाणे पोलिसांनी एका
मोठ्या कारवाईत तब्बल
१७ किलो ९२४
ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी)
या अंमली पदार्थाचा साठा
जप्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात या
ड्रग्जची किंमत सुमारे ३१
कोटी ८४ लाख
रुपये आहे. या कारवाईत दोन
सराईत आरोपींना अटक
करण्यात आली असून, गुन्हे
शाखेच्या घटक-०२, भिवंडी
पथकाने ही यशस्वी
कामगिरी बजावली आहे.
ठाणे शहर
पोलीस आयुक्तांनी अंमली
पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर
कारवाई करण्याचे आदेश
दिले होते. त्यानुसार, दिनांक ०९/०८/२०२७ रोजी पोलिसांना गुप्त
माहिती मिळाली की,
पूर्व द्रुतगती महामार्गावर नाशिक-ठाणे वाहिनीवर रांजणोली, भिवंडी
बायपासजवळ दोन इसम अंमली
पदार्थ विकण्यासाठी येणार
आहेत.
या माहितीच्या आधारे
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखेच्या पथकाने महामार्गावर सापळा
रचला. या सापळ्यातून १७
किलो ९२४ ग्रॅम
वजनाचा मेफेड्रॉन (एमडी)
हा अंमली पदार्थ
जप्त करण्यात आला
असून, दोन आरोपींना वाहनांसह अटक
करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे
शाखा, घटक-०२,
भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे
आणि त्यांच्या टीमने
केली आहे.
Thane Police, Drug Bust, Mephedrone, MD Drugs, Crime,
Arrest, Crime Branch, Thane
#ThanePolice #DrugBust #CrimeNews #Mephedrone #MDDrugs #ThaneCity #PoliceAction #ThaneCrimeBranch #MumbaiPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: