प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
मुंबई, (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण आणि भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल.
यावेळी मुख्यालयाचे प्रभारी रविंद्र अनासपूरे, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, विक्रांत पाटील, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, भाजपा नेते राज के. पुरोहित यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात होणार आहे.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
BJP Maharashtra
Independence Day
Ravindra Chavan
Flag Hoisting
Mumbai Event
#BJP #Maharashtra #IndependenceDay #FlagHoisting #RavindraChavan #Mumbai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: