हडपसर पोलीस स्टेशनचा माणुसकीचा चेहरा
दिनांक ०८/०८/२०२५ रोजी तक्रारदार सराफ कट्टा, मगरआळी, हडपसर येथे त्यांच्या घरातील ३.५ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस गहाण ठेवण्यासाठी आले होते. परंतु, दागिने गहाण ठेवण्याचा विचार बदलल्याने ते परत जात असताना नेकलेस पॅन्टच्या खिशात ठेवून निघाले. घरी पोहोचल्यावर त्यांना नेकलेस हरवल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही तो न मिळाल्याने तक्रारदारांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथकाला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. तपास पथकाने ९ आणि १० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांत हडपसर परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना हरवलेला ३.५ तोळ्याचा नेकलेस शोधण्यात यश आले.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या हस्ते तक्रारदार यांना त्यांचा हरवलेला दागिना परत करण्यात आला. दागिना परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले. ही कामगिरी अपर आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील आणि उपआयुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Pune, Police, Hadapsar Police, Lost and Found, Gold Necklace, Crime, Maharashtra Police
#PunePolice #HadapsarPolice #LostAndFound #GoldNecklace #PuneCity #PoliceAction #MaharashtraPolice #GoodWork

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: