नागरिकांना आवाहन: पीएमसीच्या 'तिरंगा सायकल रॅली' मध्ये सहभागी व्हा
पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये सुमारे १००० सायकलस्वार सहभागी होण्याची शक्यता आहे.
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी या रॅलीत ७५० सायकलस्वार सहभागी झाले होते. यावर्षी नागरिकांना bit.ly/TirangaRaly या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही सायकल रॅली सकाळी ८.१५ वाजता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीपासून सुरू होणार आहे. या रॅलीचा मार्ग पुणे मनपा भवन, मॉर्डन कॅफे, जंगली महाराज रस्ता, खंडूजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिवारवाडा आणि पुन्हा पुणे मनपा भवन येथे समारोप होईल.
रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट आणि मेडल्स देण्यात येतील. तसेच, रॅलीच्या समाप्तीनंतर त्यांच्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
Pune, PMC, Har Ghar Tiranga, Independence Day, Cycle Rally, Cultural Event, Public Event
#Pune #PMC #HarGharTiranga #IndependenceDay #CycleRally #PuneCity #Maharashtra #TirangaRally #August15

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: