माऊली नगर परिसरात पोलिसांचा छापा; बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या महिला ताब्यात
पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. या महिला विना-परवाना घुसखोरी करून पुण्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे विशेष पथक ११ ऑगस्ट २०२५ रोजी आंबेगाव कात्रज परिसरात बांगलादेशी नागरिकांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल घावटे आणि प्रफुल्ल मोरे यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे माऊली नगर, सुखसागर, पुणे येथे छापा टाकला असता मुसम्मद सोनी अब्दुल समद खातून (वय २२) आणि मोनीरा बेगम (वय २६), मूळ रा. गुजिया, शिबगंज, जिल्हा बोगरा, ढाका बांगलादेश, या दोन महिला आढळून आल्या.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशाचे ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र सापडले. मात्र, त्यांनी भारतात विना-परवाना प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उपआयुक्त (गुन्हे शाखा) निखिल पिंगळे, सहा. आयुक्त (गुन्हे शाखा) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वाहीद पठाण आणि त्यांच्या पथकाने केली.
Crime, Pune, Police, Bangladeshi Nationals, Illegal Immigration, Arrest
#PunePolice #CrimeNews #BangladeshiNationals #IllegalImmigration #Pune #Arrest #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: