पाणीपुरवठा, ॲग्रोटेक हब, कार्गो विमानतळ यांसारख्या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सांगली, (प्रतिनिधी): काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
हा प्रवेश म्हणजे भाजपासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, "सांगलीच्या विकासासाठी मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे." त्यांनी शुद्ध पाणीपुरवठा, ॲग्रोटेक हब, कार्गो विमानतळ, पर्यटन विकास आणि गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्याबाबतच्या पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी कुपवाड, मिरज आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
Prithviraj Patil
BJP
Sangli Politics
Devendra Fadnavis
Political Party Entry
#PrithvirajPatil #BJP #Sangli #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #PartyEntry

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: