रॅलीची सुरुवात सावंतवाडी राजवाड्यापासून; जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात समारोप
सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या 'तिरंगा रॅली'ला सावंतवाडी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विद्यार्थी, रिक्षा संघटना आणि सामाजिक संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला. 'तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो, त्यामुळे या राष्ट्रध्वजाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते आणि 'हर घर तिरंगा' अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी केले.
सावंतवाडी राजवाड्यापासून सुरू झालेली ही रॅली शहरातून फिरून जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान परिसरात समारोप झाली. या रॅलीत 'भारत माता की जय..!!', 'वंदे मातरम..!!' आणि 'भारतीय सैन्याचा विजय असो..!!' अशा घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीत मिलाग्रीस हायस्कूल, पंचम खेमराज महाविद्यालय, भोसले नॉलेज सिटी, आरपीडी हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल आणि महेद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tiranga Rally
Sawantwadi
Sandeep Gawade
Independence Day
BJP Event
#TirangaRally #Sawantwadi #IndependenceDay #BJP #SandeepGawade #Sindhudurg #HarGharTiranga
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: