कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य तर कार्यवाहपदी ॲड. संतोष सावंत यांची निवड
सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा मंगेश मसके यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा नुकतीच कुडाळमध्ये पार पडली, ज्यात मसके यांची पुढील तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेत जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजारिओ पिंटो, कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य तर कार्यवाहपदी ॲड. संतोष सावंत यांचीही निवड करण्यात आली आहे. निरीक्षक म्हणून अनंत वैद्य यांनी काम पाहिले.
यावेळी मंगेश मसके यांनी विविध समित्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर केली. ‘कोमसापची युवाशक्ती वाढविण्यावर आपला भर राहील,’ असे मसके यांनी सांगितले. तसेच, लवकरच कुडाळमध्ये युवा साहित्यिकांचा मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व युवा साहित्यिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Komasap
Mangesh Maske
Sindhudurg
Literary Council
Re-election
#Komasap #MangeshMaske #Sindhudurg #Konkan #MarathiLiterature #LiteraryNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: