अशासकीय उद्घाटनासाठी उभारलेल्या स्टेजवर कारवाई होणार का? - अरविंद शिंदे
टाकीचे काम अपूर्ण असताना उद्घाटन कोणत्या आधारावर? - विनोद रणपिसे
बोपोडी, पुणे, (प्रतिनिधी): बोपोडीतील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत चिखलवाडी येथे उभारलेल्या ३ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. या टाकीचे उद्घाटन श्रेय लाटण्यासाठी होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान चिखलवाडी दलित चळवळीतील ज्येष्ठ नागरिक श्रावण कांबळे यांच्या हस्ते जलक्रांती जनआंदोलन करून पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना थेट सवाल केला. ते म्हणाले की, "महापालिकेने या उद्घाटनासाठी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मग प्रशासनाच्या मते हा अशासकीय कार्यक्रम असेल, तर महापालिकेच्या जागेत अनधिकृत मंडप बांधून कार्यक्रम घेणाऱ्यांवर आयुक्त कारवाई करणार का?"
काँग्रेसचे सरचिटणीस विनोद रणपिसे यांनीही सत्ताधारी नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा महापालिकेच्या म्हणण्यानुसार टाकीचे काम पूर्णच झालेले नाही, तेव्हा उद्घाटन कोणत्या आधारावर केले जात आहे? अनधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का? आणि अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार?"
रणपिसे यांनी स्पष्ट केले की, जर खरोखरच उद्घाटन अधिकृत असेल, तर महापालिका आयुक्तांनी त्या ठरावाची प्रत दाखवावी. आम्ही स्वतः उद्घाटनात सहभागी होऊ. पण केवळ श्रेयासाठी नागरिकांच्या भावनांशी खेळू नये.
यावेळी माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक अजित दरेकर, मेहबूब नदाफ यांच्यासह १५० हून अधिक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. औंध रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून घोषणाबाजी करत हा मोर्चा चिखलवाडी येथील टाकीपर्यंत काढण्यात आला.
Chikhali Water Tank
Pune Congress
Arvind Shinde
Vinod Ranpise
Inauguration Controversy
#PunePolitics #ChikhaliWaterTank #PMC #ArvindShinde #Congress #Inauguration #PoliticalProtest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: