आगामी काळात काँग्रेसचे दिवस येतील : महेंद्र घरत

 

शेलघर येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण, (प्रतिनिधी): "रायगडमध्ये आजही चांगले कार्यकर्ते आहेत. सध्या लढणारी माणसे हवी आहेत आणि राहुल गांधींसारखे नेते लढत आहेत, तेच खरे शिलेदार आहेत. मला काँग्रेसचे विचार पटले आहेत, म्हणूनच मी काँग्रेसमध्ये आहे. आगामी काळात काँग्रेसचे दिवस येणारच आहेत," असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले. शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाजगृहात झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी रायगडच्या सहप्रभारी राणी अग्रवाल म्हणाल्या की, "ज्यांनी काँग्रेस सोडली आहे, त्यांची सध्या बिकट अवस्था आहे. कार्यकर्ते हेच काँग्रेसचा कणा आहेत." तर, रेखा घरत यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रिय होऊन महागाई आणि बेरोजगारीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. "काँग्रेसविषयी चुकीचे बोलल्यास सडेतोड उत्तर देऊन भाजपला 'सळो की पळो' करून सोडूया," असेही त्या म्हणाल्या.

या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. ऑल इंडिया पेट्रोलियम युनियन सेक्रेटरी जनरलपदी निवड झाल्याबद्दल किरीट पाटील, काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी राणी अग्रवाल, सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रीरंग बर्गे, श्रद्धा ठाकूर आणि नंदा म्हात्रे यांचा महेंद्र  घरत यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि गणेशमूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या बैठकीला एसटी काँग्रेसचे श्रीरंग बर्गे, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांच्यासह मार्तंड नाखवा, निखिल ढवळे, नाना म्हात्रे, वैभव पाटील, तालुकाध्यक्ष, युवा अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एका कार्यकर्त्याने हातावर राहुल गांधी यांचा टॅटू कोरल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.


English Labels:

  • Congress Review Meeting

  • Raigad Politics

  • Mahendrasheth Gharat

  • Uravan News

  • Rahul Gandhi

Search Description: 

Hashtags: #Congress #MahendrashethGharat #Raigad #Shelghar #RahulGandhi #MaharashtraPolitics #Uran

आगामी काळात काँग्रेसचे दिवस येतील : महेंद्र घरत आगामी काळात काँग्रेसचे दिवस येतील : महेंद्र  घरत Reviewed by ANN news network on ८/०९/२०२५ ०८:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".