पर्वती दर्शन येथे भरदिवसा दुकानाचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास
पुणे,
दि. ११ ऑगस्ट
- शहरात घरफोडीचे सत्र
सुरूच असून, पर्वती
दर्शन परिसरातील एका
हार्डवेअरच्या
दुकानातून चोरट्यांनी तब्बल १,०७,६०० रुपयांचा ऐवज
लंपास केला आहे.
ही घटना ९
ऑगस्ट ते १०
ऑगस्ट २०२५ या
कालावधीत भाग्यलक्ष्मी हार्डवेअर, प्लॉट नं. ५, मित्र मंडळ
कॉलनी, पर्वती दर्शन
येथे घडली.
या प्रकरणी सहकारनगर येथे
राहणाऱ्या ५४ वर्षीय इसमाने
पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. अज्ञात आरोपीने दुकानाच्या दरवाजाचे कुलूप
उचकटून आत प्रवेश
केला आणि दुकानातील ड्रॉवरमधील १४,८०० रुपये रोख
रक्कम व इतर
साहित्य असा एकूण १,०७,६०० रुपयांचा ऐवज
चोरून नेला.
या घटनेची
नोंद पर्वती पोलीस
स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २५१/२०२५, भारतीय न्याय
संहिता कलम ३०५,
३३१ (३), ३३१
(४) नुसार करण्यात आली
आहे. या गुन्ह्याचा पुढील
तपास पोलीस उपनिरीक्षक किरण
पवार करत आहेत.
आरोपींचा शोध सुरू आहे.
विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या
पुणे,
दि. ११ ऑगस्ट
- आंबेगाव बुद्रुक येथील एका विवाहितेने सासरच्या लोकांच्या शारीरिक आणि
मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
उघडकीस आली आहे.
या प्रकरणी मयत
विवाहितेच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस
ठाण्यात तक्रार दाखल केली
आहे.
फिर्यादी यांची
२७ वर्षीय मुलगी
स्नेहा विशाल झेंडगे
हिचे लग्न झाल्यानंतर ती
पतीसोबत आंबेगाव येथील फ्लॅट क्रमांक ६०४,
फेज ३, जी.व्ही. ७ येथे
राहत होती. लग्नानंतर पती, सासू आणि
सासरे यांनी संगनमत
करून तिला माहेराहून पैशाची
मागणी केली. तसेच, टोचून बोलून
तिचा शारीरिक आणि
मानसिक छळ केला.
या छळाला
कंटाळून स्नेहाने राहत्या घरी गळफास घेऊन
आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद
आहे. ही घटना
२ मे २०२४
ते ९ ऑगस्ट
२०२५ या कालावधीत घडली.
या घटनेप्रकरणी भारती
विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक ३७४/२०२५, भारतीय
न्याय संहिता कलम
१०८, ८५, ११५
(२), ३५२, ३५१
(२) (३), ३
(५) नुसार गुन्हा
दाखल करण्यात आला
आहे. या प्रकरणात अद्याप
आरोपींना अटक करण्यात आलेली
नाही. पुढील तपास
सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड
करत आहेत.
दोन अनोळखी व्यक्तींनी दीड लाखांचे मंगळसूत्र लांबवले
पुणे,
दि. ११ ऑगस्ट
- रस्त्यात दुचाकी थांबवून 'पुढे
चेकिंग चालू आहे,
दागिने काढून बॅगमध्ये ठेवा'
असे सांगून एका
महिलेचे तब्बल १,४०,००० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र फसवणूक
करून चोरून नेल्याची घटना
वारजे माळवाडी येथे
घडली आहे. ही घटना १०
ऑगस्ट २०२५ रोजी
सकाळी १०.१५
वाजता हरिभाऊ पाटलू
चौधरी चौकात, शुभ
कन्स्ट्रक्शनच्या
नवीन इमारतीसमोर, वारजे
चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर घडली.
याबाबत कोथरूड
डेपो येथे राहणाऱ्या ५८
वर्षीय महिलेने वारजे
माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. फिर्यादी आणि
त्यांचे पती दुचाकीवरून जात
असताना, त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन
अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी
अडवून थांबण्यास सांगितले. 'पुढे चेकिंग चालू
आहे, तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने
काढून बॅगमध्ये ठेवा'
असे सांगून त्यांनी फिर्यादीची नजर
चुकवून त्यांच्या गळ्यातील १,४०,००० रुपये
किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र फसवून घेतले आणि
पळ काढला.
याप्रकरणी वारजे
माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक ३३९/२०२५, भारतीय
न्याय संहिता कलम
१२६ (२), ३१८
(४), ३०३ (२),
३ (४) नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. या गुन्ह्याचा तपास
पोलीस उपनिरीक्षक शिरोळे
करत आहेत. आरोपींचा शोध
सुरू आहे.
धनकवडीतील महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पुणे,
दि. ११ ऑगस्ट
- धनकवडी येथील एका
५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ७५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरील दोन
अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले
आहे. ही घटना
१० ऑगस्ट २०२५
रोजी सकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास रंगोली
साडी सेंटर, आशापुरा ज्वेलर्स, बालाजी
नगर, पुणे येथे
घडली.
याबाबत धनकवडी
येथे राहणाऱ्या महिलेने सहकारनगर पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला पायी जात
असताना, समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन
अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा
केला.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस
ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२२/२०२५, भारतीय न्याय
संहिता कलम ३०४
(२) नुसार गुन्हा
दाखल करण्यात आला
आहे. पुढील तपास
सहायक पोलीस निरीक्षक सागर
पाटील करत आहेत.
आरोपींचा शोध सुरू आहे.
रिचार्ज संपल्याचे निमित्त करत मोबाईल जबरदस्तीने चोरला
पुणे,
दि. ११ ऑगस्ट
- मोबाईलचा रिचार्ज संपल्याचे निमित्त करून एका तरुणाकडून फोन
मागून तो जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना
येरवडा येथे घडली
आहे. ही घटना
९ ऑगस्ट २०२५
रोजी सकाळी ७
वाजता केंद्रीय विद्यालय समोर,
सादलबाबा चौक, येरवडा येथे
घडली.
या प्रकरणी येरवडा
येथे राहणाऱ्या २५
वर्षीय तरुणाने येरवडा
पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
केली आहे. फिर्यादी पायी जात असताना,
पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले. मोबाईलचा रिचार्ज संपला असल्याचे भासवून
फोन लावण्याच्या बहाण्याने त्यांनी फिर्यादीचा ७,००० रुपये किमतीचा मोबाईल
जबरदस्तीने चोरून नेला.
याप्रकरणी येरवडा
पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक ५४९/२०२५, भारतीय
न्याय संहिता कलम
३०४ (१) (२)
नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस
उपनिरीक्षक सुर्वे करत आहेत.
हिंजवडीत किरकोळ वादातून आयटी अभियंत्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला
पिंपरी-चिंचवड, दि. ११ ऑगस्ट - हिंजवडी येथील
पांडवनगरमधील एका पेइंग गेस्ट
(पी.जी.) मध्ये
जेवणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन गंभीर
हल्ल्यात झाले. आरोपीने एका
आयटी अभियंत्याच्या डोक्यात बिअरची
रिकामी बाटली मारून
त्याला गंभीर जखमी
केले. ही घटना
९ ऑगस्ट २०२५
रोजी रात्री १०.३० वाजता होम
स्टे हॉस्पिटॅलिटी पी.जी., पांडवनगर, हिंजवडी येथे
घडली.
या प्रकरणी अभिनव
मनोजकुमार पाठक (वय २७,
आयटी इंजिनिअर) यांनी
हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. फिर्यादी हे
लक्ष्मण साही यांच्या रूममध्ये जेवण
करत असताना आरोपी
मिलन साहू (वय
अंदाजे ३०, मूळ
नेपाळचा) याच्यासोबत त्यांचा किरकोळ वाद झाला.
त्यानंतर फिर्यादी त्यांच्या रूममध्ये जाऊन
झोपले. रात्री १०.३० वाजता ते
टेरेसवर गेले असता, आरोपी
आणि इतर दोघे
बिअर पीत होते.
दुपारच्या वादाचा
राग मनात धरून
आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची रिकामी बाटली
मारली, ज्यामुळे ते
गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस
ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४८/२०२५, भारतीय न्याय
संहिता कलम ११८
(२), ३५२ नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. पुढील तपास
पोलीस उपनिरीक्षक झोल
करत आहेत.
निगडीत शेजाऱ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून कुटुंबाला जखमी केले
पिंपरी-चिंचवड, दि. ११
ऑगस्ट - 'माझ्याविषयी बोलत
होतास का?' या क्षुल्लक कारणावरून दोन
शेजाऱ्यांनी एका तरुणाला आणि
त्याच्या आई-वडिलांना लोखंडी
रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण
केल्याची घटना निगडी येथे
घडली आहे. ही घटना ९
ऑगस्ट २०२५ रोजी
रात्री १०.४५
वाजता निगडीतील अजिंठानगर येथील
रमाबाई शाळेच्या पाठीमागे, फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली.
या प्रकरणी अमोल
उर्फ अमर उत्तम
ढोबळे (वय ३३)
यांनी निगडी पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांचे आई-वडील यांच्यासोबत घरात
बोलत असताना शेजारी
राहणाऱ्या आरोपी क्रमांक १
दयानंद घाडगे याने
दरवाजा वाजवून त्यांना बाहेर
बोलावले. 'तुम्ही माझ्याबद्दल बोलत
होता का?' असे विचारून आरोपीने राग
मनात धरून फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी
केली आणि हातातील लोखंडी
रॉडने डोक्यात मारून
जखमी केले. त्यावेळी आरोपी क्रमांक २
मनोज घाडगे यानेही
फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण
केली.
याप्रकरणी निगडी
पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक ३४४/२०२५, भारतीय
न्याय संहिता कलम
११८ (१), ११५
(२), ३५१ (२),
३५२, ३ (५)
नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास
पोलीस हवालदार चौधरी
करत आहेत.
अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुण जेरबंद
: पिंपरी-चिंचवड, दि. ११ ऑगस्ट - पोलीस आयुक्तांच्या बंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई १० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.२५ वाजता शंकरनगर, विद्यानगरमधील खदानीजवळ रस्त्यावर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस
नाईक रामचंद्र मारुती
तळपे (वय ३५,
बक्कल नं. १२९१)
यांनी पिंपरी पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज शहाजी शेवाळे
(वय २५, रा.
नवी मुंबई) याने
पोलीस आयुक्तांच्या बंदी
आदेशाचे उल्लंघन करून, कमरेला चाळीस
हजार रुपये किमतीचे देशी
बनावटीचे पिस्तूल आणि पाचशे रुपये
किमतीचे एक जिवंत काडतूस
बाळगले होते.
याप्रकरणी पिंपरी
पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक ४०१/२०२५, भारतीय
हत्यार कायदा कलम
३, २५, आणि
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
चे कलम ३७
(१) सह १३५
नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक
पोलीस निरीक्षक अतिग्रे करत
आहेत.
भोसरीत भरलेल्या सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरताना एकाला अटक
पिंपरी-चिंचवड, दि. ११ ऑगस्ट - भोसरी
येथील एका दुकानातून घरगुती
गॅस सिलेंडरची अवैध
रिफिलिंग करताना एकाला रंगेहाथ अटक
करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९४
हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
केला आहे. ही घटना ९
ऑगस्ट २०२५ रोजी
रात्री ७ वाजण्याच्या सुमारास मुक्ता
पार्क, चक्रपाणी वसाहत,
भोसरी येथील लक्ष्मी गॅस
इंटरप्रायजेस या दुकानात घडली.
या प्रकरणी पोलीस
नाईक प्रकाश कृष्णा
भोजणे (वय ४१,
बक्कल नं. १८१०)
यांनी भोसरी पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर दयानंद माने (वय
२६) हा भरलेल्या घरगुती
सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये विनापरवाना भरत
होता. मानवी जीविताला धोका
निर्माण होईल हे माहीत
असूनही त्याने ज्वालाग्राही पदार्थाबाबत आवश्यक
ती खबरदारी घेतली
नव्हती.
याप्रकरणी भोसरी
पोलीस ठाण्यात गुन्हा
क्रमांक ३६५/२०२५, भारतीय
न्याय संहिता कलम
२८७, २८८ आणि
जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५
चे कलम ३,
७ सह (पुरवठा
आणि वितरण नियमन)
आदेश २००० चे
कलम ३, ४,
५, ६, ७
नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस
उपनिरीक्षक कस्तुरे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: