मुंबई: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सार्वजनिक शांततेला कोणताही धोका पोहोचू नये , यासाठी पोलीस उपायुक्त (अभियान), बृहन्मुंबई, अकबर पठाण यांनी संपूर्ण मुंबई शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश ५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू राहील.
या आदेशानुसार, मुंबई
शहरात पाच किंवा
त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र
येण्यास , कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास आणि मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये
किंवा फटाके फोडण्यास मनाई
आहे. हे आदेश
मानवी जीवन आणि
मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आणि
कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी जारी
करण्यात आले आहेत.
या
आदेशात काही बाबींना सूट
देण्यात आली आहे. यामध्ये विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, कंपन्या, क्लब,
सहकारी संस्थांच्या कायदेशीर बैठका,
सामाजिक मेळावे, चित्रपटगृहांमधील कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र
येणारे लोक, सरकारी
कार्यालये आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये
एकत्र येणारे लोक
यांचा समावेश आहे.
तसेच, विभागीय पोलीस
उपायुक्त यांनी परवानगी दिलेल्या इतर
संमेलनांना आणि मिरवणुका यांनाही सूट
देण्यात आली आहे.
Mumbai Police, Prohibitory Order, Law and Order, Public Safety, Akbar Pathan
#MumbaiPolice #ProhibitoryOrder #LawAndOrder
#PublicSafety #Mumbai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: