जेएनपीए येथे ‘ग्रीन अँड डिजिटल मेरिटाईम कॉरिडॉर्स लिडर्स डायलॉग’ कार्यक्रमाचे आयोजन
सिंगापूरचे उप पंतप्रधान गान किम येंग यांची व्यासपीठावर उपस्थिती
उरण, (प्रतिनिधी): भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढत्या सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील संबंधांना यामुळे नवीन आयाम मिळेल, असेही ते म्हणाले. तसेच, वाढवण बंदर विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने जेएनपीए बिझनेस सेंटर, उरण येथे आयोजित केलेल्या 'ग्रीन अँड डिजिटल मेरिटाईम कॉरिडॉर्स लिडर्स डायलॉग' कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात सिंगापूरचे उप पंतप्रधान गान किम येंग, सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सियो, जेएनपीए चेअरमन उन्मेष वाघ आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रन यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत आणि सिंगापूर यांच्यातील अनेक सामंजस्य करारांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना बळकटी मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis
JNPA
Singapore Collaboration
Maritime Corridor
Wadhavan Port
#DevendraFadnavis #JNPA #Singapore #WadhavanPort #Maritime #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: