पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 'घरोघरी तिरंगा' मोहिमेअंतर्गत देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या विविध उपक्रमांना शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारचे देशभक्तीपर उपक्रम खऱ्या अर्थाने नागरिकांमधील एकता आणि देशाभिमान वाढवणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारने २०२२ पासून 'घरोघरी तिरंगा' ही मोहीम सुरू केली आहे. यंदाही ही मोहीम २ ते १५ ऑगस्ट २०२५ या काळात आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेने या काळात तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे आणि देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत.
याच मोहिमेअंतर्गत भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात 'भारत गौरव गाथा - देश प्रेमाच्या स्वर लहरी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती. उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
तृप्ती सांडभोर यांनी नागरिकांना या देशभक्तीच्या उत्सवाला असाच चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपायुक्त अण्णा बोदडे यांनी 'घरोघरी तिरंगा' मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे दिग्दर्शक उदय साटम आणि ज्योती साटम यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Trupti Sandbhor
Ghar Ghar Tiranga
Cultural Event
Patriotism
#PimpriChinchwad #GharGharTiranga #TruptiSandbhor #Patriotism #CulturalEvent #AmritMahotsav

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: