डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून सन्मान
पुणे/बोपोडी, (प्रतिनिधी): बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ब्रम्हकुमारी डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांना 'बोपोडी भूषण २०२५' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी केनेडी युनिव्हर्सिटीने त्यांना 'अध्यात्मिक विज्ञान' विषयात डॉक्टरेटही दिली आहे.
बोपोडीतील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. त्रिवेणी बहिरट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. "बोपोडी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी संघटनेने मला 'बोपोडी भूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले, याचा मला अभिमान वाटतो. माझ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान दिला गेला आहे," असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात नगरसेवक आणि पीएमपीएल अध्यक्ष प्रकाश ढोरे, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, आनंद छाजेड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बोपोडीतील अनेक ग्रामस्थ आणि विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
बोपोडी भूषण पुरस्काराची संकल्पना विजय सरोदे यांची असून, हा पुरस्कार यापुढे दरवर्षी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Bopodi Bhushan Award
Dr. Triveni Bahirat
Social Recognition
Pune Awards
Spiritual Leadership
#BopodiBhushan #TriveniBahirat #PuneAwards #SpiritualLeader #CommunityAward #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: