दापोली, गुहागरसह रत्नागिरीतील प्रसिद्ध मंदिरांमध्येही गर्दी
रत्नागिरी, (प्रतिनिधी): पवित्र श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आल्याने आज रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे पहाटे साडेतीन वाजता मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते पूजा-अर्चा आणि आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री साडेदहा वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
या यात्रोत्सवासाठी ५० ते ६० हजार भाविक येण्याचा अंदाज असून, मंदिर प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणांनी आधीच नियोजन करून चोख तयारी केली आहे. मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली आहे.
गणपतीपुळ्यासोबतच जिल्ह्यातील इतर प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्येही भाविकांनी गर्दी केली आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे, दापोली तालुक्यातील आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती, गुहागर तालुक्यातील हेदवीचा दशभुजा गणेश आणि रत्नागिरी शहरातील अठरा हातांचा गणपती यांचा समावेश आहे.
Angaraki Sankashti Chaturthi
Ratnagiri
Ganpatipule Temple
Temple Festival
Devotees
#Angaraki #SankashtiChaturthi #Ganpatipule #Ratnagiri #GaneshTemple #Maharashtra #Shravan
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: