काँग्रेसमधील
वरिष्ठ नेत्यांना योग्य सल्ला दिला जात नसल्याची फैजल पटेल यांची टीका
नवी दिल्ली, (प्रतिनिधी): काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा केली आहे. फैजल पटेल यांनी म्हटले आहे की, आपल्या सशस्त्र दलांमुळे आपला देश सुरक्षित हातात आहे.
फैजल
पटेल म्हणाले की,
सध्या देश चालवणारे नेते
नरेंद्र मोदी, डॉ. एस.
जयशंकर, अमित
शाह, राजनाथ सिंह
आणि सुधांशू त्रिवेदी कठोर
परिश्रम करत आहेत. त्यांनी काँग्रेसमधील काही
प्रतिभावान नेत्यांची नावे घेतली, ज्यात
शशी थरूर, डी.के. शिवकुमार, रेवंत
रेड्डी, दीपेंद्र हुडा
आणि सचिन पायलट
यांचा समावेश आहे.
यासोबतच, राहुल
गांधी हे एक
मेहनती नेते आहेत
असे सांगत त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत समस्यांवरही बोट
ठेवले. फैजल पटेल
म्हणाले की, "पक्षातील वरिष्ठ नेत्यांना योग्य
सल्ला दिला जात
नाही. त्यांचे सल्लागार चांगले
काम करत नाहीत,"
अशी टीकाही त्यांनी केली.
Faisal Patel
Ahmed Patel
Narendra Modi
Indian National Congress
Political Statement
#FaisalPatel #NarendraModi #AhmedPatel #Congress #IndianPolitics #RahulGandhi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: