महानगरपालिकेकडून 'बाईक रॅली' आणि 'वृक्षारोपण' कार्यक्रमाचे आयोजन
वसई-विरार, (प्रतिनिधी): 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 'घरोघरी तिरंगा' मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने ३ किलोमीटरच्या 'तिरंगा दौड'चे आयोजन केले होते. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी आणि धावपटूंनी सहभाग घेतला.
या दौडमध्ये ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी ३० फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी आणि उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. नागरिकांनीही या दौडमध्ये सहभागी होऊन उत्तम देशभक्तीपर वातावरण निर्माण केले.
याच अभियानांतर्गत 'बाईक रॅली' आणि 'वृक्षारोपण कार्यक्रम' देखील आयोजित करण्यात आला होता. या बाईक रॅलीमध्ये प्रभाग समितीमधील अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
Ghar Ghar Tiranga
Vasai Virar
Tiranga Daud
Amrit Mahotsav
Freedom Day
#GharGharTiranga #VasaiVirar #TirangaDaud #AmritMahotsav #BikeRally #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: