पुणे गुन्हे शाखा युनिट-५ ची यशस्वी कामगिरी
पुणे
(प्रतिनिधी) - पुणे गुन्हे शाखा
युनिट-५ ने
(Crime Branch Unit 5) वानवडी
पोलीस ठाण्यात दाखल
असलेल्या खुनाच्या एका गुन्ह्यातील तीन
आरोपींना सुमारे तीन वर्षांनंतर परराज्यातून (कर्नाटक) अटक
करण्यात यश मिळवले आहे.
हे आरोपी गुन्हा
घडल्यापासून आपली ओळख लपवून
वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते
आणि फिर्यादीला वेळोवेळी जीवे
मारण्याची धमकी देत होते.
गुन्हेगारांचा इतिहास आणि गुन्हा
वानवडी
पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०५/२०२३ नुसार भारतीय
दंड संहिता कलम
१४३, १४४, १४७,
१४८, १४९, ३०२,
३०७, ३२३, ५०४,
भारतीय हत्यार कायदा
कलम ४ (२५),
क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा
कलम ७, आणि
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम
३७ (१), ३७
(३) सह १३५
अन्वये गुन्हा दाखल
होता. या गुन्ह्यातील पाहिजे
असलेले आरोपी १)
सिकंदर आयुब शेख/सय्यद (वय ३४),
२) जाकीर कादीर
सय्यद (वय ४२),
आणि ३) अमिर
अकील सय्यद (वय
२३) हे तिघेही
सय्यदनगर, हडपसर, पुणे येथील
रहिवासी होते. मात्र, गुन्हा
घडल्यापासून ते पोलिसांना गुंगारा देत
होते.
पोलिसांची गुप्त माहिती आणि कारवाई
पुणे
शहरातील पाहिजे/फरार आरोपींचा शोध
घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश
वरिष्ठांनी गुन्हे शाखेला दिले
होते. त्यानुसार, गुन्हे
शाखा युनिट-५
चे पोलीस पथक
आरोपींचा शोध घेत होते.
पोलीस अंमलदार नासेर
देशमुख यांना गुप्त
माहिती मिळाली की,
हे तिन्ही आरोपी
कर्नाटक राज्यातील विजापूर येथील असर गल्ली,
गोलघुमज येथे राहत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, गोलघुमज ग्रामीण पोलीस स्टेशन, विजापूर, कर्नाटक यांच्या हद्दीतून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सिकंदर आयुब शेख/सय्यद, जाकीर कादीर सय्यद आणि अमिर अकील सय्यद या तिघांना ताब्यात घेतले. हे आरोपी गुन्हा घडल्यापासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी आपली ओळख लपवत होते, तसेच या गुन्ह्यातील फिर्यादींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जीवे ठार मारण्याची धमकी देत होते.
Crime News, Pune Police, Murder Case, Fugitive Arrest
#PunePolice #CrimeBranch #MurderArrest #Fugitive #WanwadiPolice #Pune #Karnataka #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: