लोणावळा ते पुणे दुपारची लोकल आणि बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करा: खासदार बारणे
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मावळ मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांवर चर्चा
खासदार बारणे यांनी दिल्लीत रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी पुणे-लोणावळा दरम्यान दुपारी दीड वाजताची लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याची आणि कोरोना काळात बंद केलेले लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या मागण्या मान्य करत लवकरच हे थांबे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे हे औद्योगिक, व्यापार आणि शैक्षणिक केंद्र असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मुंबई-पुणे कॉरिडॉर अंतर्गत येणारी पनवेल, तळोजा, तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी ही औद्योगिक क्षेत्रे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे या भागांत मालवाहतुकीसाठी नवीन रेल्वे मार्ग आवश्यक आहे. मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
त्याचप्रमाणे, पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती देण्याची मागणीही बारणे यांनी केली. दररोज एक लाख नागरिक या मार्गावर प्रवास करतात, मात्र दोन ट्रॅकमुळे त्यांना अनेक अडचणी येतात. २००७ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी मान्यता मिळाली असून, रेल्वेकडे जमीनही उपलब्ध आहे. हे काम पूर्ण झाल्यास मुंबई आणि पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक अधिक जलद आणि सुगम होईल.
Srirang Barne, Railways, Mumbai-Pune Fast Track, Lonavala Local, Pimpri, Ashwini Vaishnaw. S
#SrirangBarne #IndianRailways #MumbaiPune #FastTrack #LonavalaLocal #Pimpri #RailwayMinister #MPBarne

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: