पुणे, (प्रतिनिधी): पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी आणि येवलेवाडी अशा पाच नवीन पोलीस स्टेशनची मागणी असून, त्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या पोलीस स्टेशनसाठी आवश्यक असलेल्या एक हजार मनुष्यबळालाही मान्यता दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, पुण्यातील वाढत्या वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन पुढील १० वर्षांसाठी एक सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. हा आराखडा लवकरच जनतेसाठी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यांच्या सूचनांच्या आधारे अंतिम आराखडा तयार केला जाईल.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्यातील पोलीस दलासाठी ५ टक्के, म्हणजेच १ हजार १०० कोटी रुपये राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी पोलीस दलाला गेल्या दोन वर्षांत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Pune Police Stations
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Pune Traffic
Law and Order
#Pune #DevendraFadnavis #PoliceStation #PunePolice #AjitPawar #TrafficManagement #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: