पुणे, (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या हडपसर पोलीस स्टेशनने एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक करून, केवळ ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या जलद कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित
महिलेने आरोपी सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय
३६, रा. मुंढवा,
पुणे) सोबत राहण्यास नकार
दिल्याने , त्याने रागातून तिचा
वारंवार पाठलाग केला, तिचा
येण्या-जाण्याचा रस्ता
अडवला आणि तिचा
हात पकडून विनयभंग केला.
या गैरवर्तनामुळे तिच्या
स्त्री मनास लज्जा
उत्पन्न झाली. या प्रकरणी हडपसर
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
दाखल करण्यात आला
होता.
गुन्ह्याचा तपास
महिला सहाय्यक पोलीस
निरीक्षक हसीना शिकलगार यांच्याकडे सोपवण्यात आला
होता. तपास पथकाने
तातडीने आरोपी सुमीत चाबुकस्वार याला
ताब्यात घेतले. तसेच, निर्भया पीडित
महिलेचा जबाब माननीय न्यायालयात नोंदवण्यात आला.
गुन्ह्याशी संबंधित साक्षीदारांचे जबाब
नोंदवून, आरोपीने वापरलेले वाहन पुरावा म्हणून
जप्त करण्यात आले
आहे.
या प्रकरणात ई-साक्ष प्रणालीचा वापर
करून तांत्रिक पुरावे
गोळा करण्यात आले.
त्यानंतर, दिनांक
३१/०७/२०२५
रोजी लष्कर न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीविरुद्ध ४८
तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल
करण्यात आले.
ही
कारवाई पोलीस उपायुक्त डॉ.
राजकुमार शिंदे,
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय
मोगले, आणि पोलीस
निरीक्षक निलेश जगदाळे व
श्रीमती अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात
सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना
शिकलगार आणि पोलीस अंमलदार विनोद
शिर्क यांचा समावेश
होता.
Molestation, Crime, Pune
Police, Hadapsar Police Station
#PunePolice #Hadapsar #MolestationCase #CrimeNews #Chargesheet #FastAction #WomensSafety

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: