बंगळुरू : बंगळुरू येथील खासदार-आमदार यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयाने माजी खासदार प्रज्वल रेवन्नाला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा निर्णय एका अश्लील व्हिडिओ आणि ४७ वर्षीय महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित आहे.
न्यायालयाने दोषी प्रज्वल रेवन्नावर १० लाख रुपयांचा दंड लावण्यासोबतच पीडित महिलेला ७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू आहे. त्याच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप होता.
हे प्रकरण रेवन्ना यांच्या गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका नोकरणीच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहे. पीडितेने आपल्या जबाबात दोन वेळा बलात्कार झाल्याचे सांगितले होते. प्रज्वल रेवन्ना गेल्या वर्षी ३१ मे पासून कारागृहात आहे. २० २४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेला होता. जर्मनीतून परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
विशेष न्यायालयाने हा निकाल कालच दिला होता, पण शिक्षेची घोषणा आज करण्यात आली. प्रज्वल रेवन्नावर याच प्रकारचे तीन अतिरिक्त गुन्हे दाखल असून, त्यांची सुनावणी सुरू आहे.
Prajwal Revanna, Life Imprisonment, Rape Case, Karnataka Court
#PrajwalRevanna #KarnatakaCrime #LifeImprisonment #RapeCase #CourtVerdict #BengaluruNews #HDDeveGowda #JusticeServed

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: