पुणे, (प्रतिनिधी): पुणे शहरात एका धक्कादायक घटनेत, एका मित्रानेच आपल्या मित्राची किरकोळ कारणावरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी, काळेपडळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज
(०२ ऑगस्ट २०२५)
पहाटे ४ वाजून
५२ मिनिटांनी पुणे
पोलीस नियंत्रण कक्षाला (डायल
११२) किसन राजमंगल सहा
(वय २०, रा.
अजगरवा, बिहार) याने
कॉल करून त्याच्या मित्राला, रविकुमार शिवशंकर यादव
(वय ३३), चार
अनोळखी व्यक्तींनी लोखंडी
पहारीने मारून जखमी केल्याचे सांगितले. ही घटना हंडेवाडी रोडवरील साईगंगा सोसायटीसमोर असलेल्या एका
पत्र्याच्या शेडमध्ये घडली.
या माहितीच्या आधारे,
काळेपडळ पोलीस स्टेशनच्या बीट
मार्शल आणि रात्रगस्त अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव
घेतली. तिथे त्यांना रविकुमार शिवशंकर यादव
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी तातडीने १०८ ॲम्बुलन्स बोलावून त्याला
तपासणीसाठी पाठवले, जिथे डॉक्टरांनी त्याला
मृत घोषित केले.
पोलिसांनी कॉल
करणाऱ्या किसन राजमंगल सहा
याची चौकशी सुरू
केली असता, त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली.
तसेच, सीसीटीव्ही फुटेज
तपासले असता, घटनास्थळी मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी
व्यक्तींची कोणतीही हालचाल दिसली नाही.
आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी
केली असता, किसन
आणि मृत यांच्यात किरकोळ
कारणावरून नेहमी भांडण होत
असल्याची माहिती मिळाली.
पोलिसी खाक्या
दाखवल्यानंतर, आरोपी किसनने गुन्ह्याची कबुली
दिली. त्याने सांगितले की,
ते रात्री एकत्र
दारू पीत असताना
रविकुमारने त्याला विनाकारण शिवीगाळ आणि
मारहाण केली. याआधीही रविकुमार त्याला वारंवार मारहाण
करत असल्याचा राग
मनात धरून, दारू
पिऊन झोपलेल्या रविकुमारच्या डोक्यात लोखंडी
पहारीने वार करून खून
केल्याची कबुली त्याने दिली.
याप्रकरणी, काळेपडळ पोलीस
स्टेशनमध्ये आरोपी किसन राजमंगल सहा
विरोधात भारतीय न्याय संहिता
कलम १०३ (भारतीय
दंड विधान कलम
३०२) अंतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला
आहे. पुढील तपास
सपोनि रत्नदीप गायकवाड करत
आहेत.
Murder, Crime, Pune Police,
Kalbhor Police Station
#PuneCrime #Murder #KalbhorPolice #PunePolice #FriendMurder #DrunkDispute #LawAndOrder #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: