सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी, याच महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. यावेळी गडकरींनी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.
यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महसूल विभागाचा आढावा घेतला. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मुंबईत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील फळबागांसाठी दर तीन वर्षांतून एकदा ई-पीक पाहणी करण्याबाबत अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
सरकारचा १५० दिवसांचा कार्यक्रम यंत्रणांचे बळकटीकरण करण्यासाठी महत्त्वाचा असून, राज्य सरकार राज्यातील १४ कोटी जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Maharashtra, Government, Mumbai-Goa Highway, Infrastructure, Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Sindhudurg
#MumbaiGoaHighway #Maharashtra #NitinGadkari #ChandrashekharBawankule #Infrastructure #RoadConstruction #Sindhudurg #Government
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: