सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरमळा येथे रास्ता रोको आंदोलन केले. अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे बळी जात असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी, गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाईक यांनी दिला. या आंदोलनानंतर महामार्ग अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्टपूर्वी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, पोलिसांनी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Maharashtra, Politics, Mumbai-Goa Highway, Protest, Shiv Sena, Infrastructure, Road Safety
#MumbaiGoaHighway #ShivSena #Protest #VaibhavNaik #Sindhudurg #Roads #Infrastructure #MaharashtraPolitics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: